शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

सिनेस्टाईल थरार! प. बंगालमध्ये मतपेट्या पळवल्या, जाळल्या, तलावातही फेकल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2023 13:45 IST

बीरभूम जिल्ह्यातील मयूरेश्वर ग्रामपंचायत येथील मतदान केंद्रातील बुथ नंबर ५६ आणि ५७ मधील मतपेट्या पळवण्यात आल्या

कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं मतदान आज होत आहे. येथे ८ जून रोजी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत राज्यात मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला असून, त्यामध्ये १८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर सुरक्षेसाठी तब्बल १ लाख ३५ हजार जवानांना तैनात करण्यात आले आहे. दरम्यान, आज मतदानादिवशीची मोठ्या प्रमाणावर हिंसेचा आगडोंब उसळला असून, त्यात काही कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला. तर काही ठिकाणी मतपेट्या पळवण्याचाही प्रकार घडला. विशेष म्हणजे काही ठिकाणी मतपेट्या जाळल्या असून तलावातही फेकून देण्यात आल्या आहेत. 

बीरभूम जिल्ह्यातील मयूरेश्वर ग्रामपंचायत येथील मतदान केंद्रातील बुथ नंबर ५६ आणि ५७ मधील मतपेट्या पळवण्यात आल्या. त्यानंतर, त्यांना आग लावून पेटवून देण्याचा सिनेस्टाईल थरात येथे पाहायला मिळाला. तर, काही बॅलेट बॉक्सची तोडफोड करुन त्यांना जवळील तलावातही फेकून देण्यात आलंय. या घटनेनंतर तेथील महिला अधिकाऱ्याला रडू कोसळल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, तृणमूल काँग्रेसच्या समर्थकांनीच हे कृत्य केल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. दरम्यान, सीताई येथेही एका मतदान केंद्रावर मोडतोड करण्यात आलीय तिथे मतपत्रिका पळवून त्या पेटवून देण्यात आल्या. या घटनेनंतर खूप वाद झाला.

कूचबिहारमधील फोलिमारी येथे हिंसाचार भडकला असून, तिथे भाजपाच्या पोलिंग एजंटची हत्या करण्यात आली आहे. शनिवारी सकाळी हल्लेखोरांनी भाजपाचे पोलिंग एजंट माधव विश्वास याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. एका ठिकाणी बॉम्बफेक करण्यात आली. त्यात सीपीआयएम उमेदवार अनिता अधिकारी जखमी झाल्याचे वृत्त आहे. पश्चिम बंगालमधील मतदानादरम्यान, आतापर्यंत ७ जणांची हत्या झाली आहे. तर मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये तृणमूलच्या ५ तर भाजपाच्या एका कार्यकर्त्याचा समावेश आहे. दरम्यान, २४ परगणा जिल्ह्यातही रस्त्याच्या शेजारी टीएमसीचा बॅनर घेऊन बसलेल्या कार्यकर्त्याची पोलिसांनी पिटाई केली. 

पश्चिम बंगाल निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार २२ जिल्ह्यातील ६३ हजार २२९ ग्रामपंचायतीच्या जागा, पंचायत समितीच्या ९ हजार ७३० जागा आणि जिल्हा परिषदेच्या ९२८ जागांवर हे मतदान होत आहे. या मतदानामधून सुमारे ५.७ कोटी मतदार उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला करणार आहेत. या निवडणुकीचा निकाल ११ जुलै रोजी जाहीर होणार आहे. २०२४ रोजी होणाऱ्या पुढील लोकसभा निवडणुकीची ही निवडणूक म्हणजे पूर्व परीक्षा म्हणून पाहिले जात आहे. 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालElectionनिवडणूकPoliceपोलिसVotingमतदान