शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

50 लाखांच्या खंडणीप्रकरणी छोटा राजनच्या राईट हँडला अटक; सख्ख्या पुतणीविरोधात गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2020 09:11 IST

सख्खी पुतणी प्रियदर्शनी निकाळजे विरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील तक्रार मागे घ्यावी व दुसर्‍या पत्नीला घटस्फोट द्यावा, यासाठी खेडचे माजी उपसभापती यांना ५०लाख रुपयांची खंडणी छोट्या राजनची सख्खी पुतणी प्रियदर्शनी निकाळजे हिने केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी २५ लाख रुपयांची खंडणीची रक्कम घेण्यासाठी आलेल्या छोट्या राजनचा राईट हँड म्हणणार्‍यास खंडणीविरोधी पथकाने सापळा रचून अटक केली आहे. धीरज बाळासाहेब साबळे (रा. धानोरे, ता़ खेड), प्रियदर्शनी निकाळजे (रा. जांभुळकर नगर, वानवडी) आणि मंदार वाईकर (रा. निधीषा सोसायटी, मार्केटयार्ड) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी कात्रज येथे राहणार्‍या खेडच्या माजी उपसभापतीने खंडणी विरोधी पथकाकडे फिर्याद दिली आहे.या उपसभापतीच्या दुसरी पत्नी व तिच्या बहिणीने त्यांच्याकडे मर्सिडीज कारची मागणी केली होती. त्यांनी शोरुममध्ये जाऊन गाडीची पाहणीही केली होती. परंतु, त्यांना पैशांची व्यवस्था करता आली नाही. त्यामुळे त्यांनी आपल्या पतीविरुद्ध भारती विद्यापीठात तक्रार केली होती. तसेच छोट्या राजनची सख्खी पुतणी प्रियदर्शनी निकाळजे हिच्याकडे तक्रार केली़.त्यावरुन ८ मार्च रोजी चेंबूरहून फिर्यादीला धमकीचा फोन आला. त्यांच्या तालुक्यातील धीरज साबळे याचा फोन आला. त्यानंतर दोघे जण वानवडीतील घरी जाऊन प्रियदर्शनी निकाळजे हिला भेटले. तिने भारती भारती विद्यापीठ पोलिसांकडील तक्रार मागे घ्यावी व दुसर्‍या पत्नीला घटस्फोट द्यावा, यासाठी ५०लाख रुपये दे. त्यातील २५ लाख रुपये मी घेणार व उरलेले तुमची पत्नी, मेव्हणी आणि मंदार वाईकर याला देणार असल्याचे सांगितले.

 त्यानंतर तिने पिस्तुल रोखून दुसर्‍या पत्नीला घटस्फोट दिला नाही तर पिस्तुलातील १० च्या १० गोळ्या घालून जीव मारेन, अशी धमकी दिली. मंदार हा छोटा राजन कंपनीचा राईट हँड आहे. आता तुझ्याकडे किती पैसे आहेत, अशी चौकशी केली. त्यावेळी त्यांनी घाबरुन एक लाख रुपये आहेत, असे सांगितले व ते १ लाख रुपये साबळे याच्याकडे दिले. या प्रकारानंतर धीरज साबळे, मंदार वाईकर आणि प्रियदर्शनी निकाळजे यांनी वारंवार फोन करुन धमकी देत पैशांची मागणी केली. धीरज साबळे याने १३ मार्च रोजी २५ लाख रुपये घेऊन हॉटेल अरोरा टॉवर येथे बोलावले. तेव्हा त्यांनी खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार केली. त्याप्रमाणे पोलिसांनी सापळा रचला. धीरज साबळे हा २५ लाख रुपये घेण्यासाठी आला असताना त्याला पोलिसांनी रंगेहाथ पकडले.

टॅग्स :Chhota Rajanछोटा राजनPoliceपोलिस