राजकुमार जाेंधळे, लातूर: वैभवनगरात दाेन गटात जुन्या भांडणावरुन राडा झाला. आराेपींनी सार्वजनिक ठिकाणी गुरुवारी दशहत निर्माण केली हाेती. दहशत माजवणाऱ्या ‘काेयता गॅग’मधील काही आराेपींच्या मुसक्या आवळत शिवाजीनगर पाेलिसांनी शनिवारी त्यांची पायी ‘वरात’ काढत घटनास्थळाची पाहणी केली. आराेपींकडून नेमका घटनाक्रम समजून घेतला.
पाेलिसांनी सांगितले, लातुरात अभिषेक जावके आणि बालाजी गुरुखेल यांच्यात जुन्या भांडणावरुन २६ फेब्रवारी राेजी राडा झाला. यातून दगडफेक करत दाेन्ही गटातील १४ ते १५ जणांमध्ये राडेबाजी झाली. शिवाय, परिसरात वाहनांची माेठ्या प्रमाणावर ताेडफाेड झाली. याबाबत शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात दाेन्ही गटाविराेधात गुन्हे दाखल केले आहेत. गुन्ह्यांचे गांभीर्य ओळखत पाेलिसांनी आराेपींच्या मुसक्या आवळत बेड्या ठाेकल्या. गाेंधळ घालत सार्वजनिक ठिकाणी दशहत निर्माण केली. त्याच भागात पाेलिसांनी शनिवारी आराेपींना नेले. घटनास्थळ परिसरात पायी फिरवत वरात काढली. गुन्हा कसा केला? याचा घटनाक्रम आराेपींकडूनच पाेलिसांनी समजून घेतला.
तपासात समाेर आला १५ आराेपींचा सहभाग
घरांवर दगडफेक करुन, वाहनांची ताेडफाेड करत दहशत निर्माण करणाऱ्या आराेपींचा शाेध घेतला असून, यातील काही जणांना बेड्या ठाेकल्या आहेत. इतर फरार आराेपींच्या मागावर पाेलिस पथके आहेत. या आराेपींनी सार्वजनिक ठिकाणी गाेंधळ घालत दशहत पसरवली आहे. - अभिषेक शिंदे, पाेलिस निरीक्षक, लातूर
परस्परविराेधी तक्रारी; यांच्यावर गुन्हा दखल
पहिली घटना: फिर्यादी संगिता श्रीकांत गुरुखेल (वय ३८ रा. गायत्रीनगर, लातूर) यांच्या तक्रारीवरुन शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात अभिषेक जावके, विठ्ठल निलामे, राजू शेख, शहनवाज सय्यद, राहुल ढवारे याच्यासह इतर दाेघांविराेधात (सर्व रा. लातूर) यांच्याविराेधात गुन्हा दाखल केला आहे.
दुसरी घटना: फिर्यादी अशाेक प्रल्हादराव जावके (वय ५९ रा. समर्थ नगर, लातूर) यांच्या तक्रारीवरुन शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात बालाजी श्रीकांत गुरखेल, सुमित शेंडगे, आयुष निलामे, सुनिल देवकते, सुमित सगर, लट्या शेख, रिहाण शेख, धिरज नरवडे (सर्व रा. गायत्री नगर, लातूर) यांच्याविराेधात गुन्हा दाखल केला आहे.
Web Summary : Latur police arrested members of a Koyta gang after a violent clash between two groups over an old feud. The suspects were paraded through the crime scene, allowing police to reconstruct the event.
Web Summary : लातूर पुलिस ने एक पुराने विवाद को लेकर दो गुटों के बीच हिंसक झड़प के बाद कोयता गिरोह के सदस्यों को गिरफ्तार किया। पुलिस ने घटना को फिर से बनाने के लिए संदिग्धों को अपराध स्थल पर परेड कराया।