शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मुलांच्या १८ वर्षांनंतरच्या स्वातंत्र्यावर बॅन आणावा; श्रद्धाला गमविल्यानंतर वडिलांची कळकळीची विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2022 19:41 IST

Shraddha Walker Murder Case: श्रद्धा वालकरचे वडील विकास वालकर यांनी आज महाराष्ट्राचे उपमु्ख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली.

मुंबई- श्रद्धा वालकरचे वडील विकास वालकर यांनी आज महाराष्ट्राचे उपमु्ख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी भाजपाचे नेते किरीट सोमय्या देखील उपस्थित होते. या भेटीत तुम्हाला न्याय मिळवून देण्याचं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती विकास वालकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली. तसेच आफताबने पूनावाला याने माझ्या मुलीची हत्या केली. त्याला कठोर शिक्षा व्हायला हवी, तसेच त्याच्या कुटुंबियांचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी विकास वालकर यांनी केली.

आफताब, त्याचे कुटुंबीय अन् पोलीस; श्रद्धाचे वडील फडणवीसांना भेटले, माध्यमांसमोर सर्व बोलले!

 माझ्या मुलीसोबत जे झाले, असं कोणासोबतही होऊ नये, अशी माझी अपेक्षा असल्याचं विकास वालकर यांनी बोलावून दाखवलं. तसेच १८ वर्षांनंतर स्वातंत्र्य दिले जाते, यावर विचार व्हावा, अशी मागणी देखील विकास वालकर यांनी केली आहे. तसेच मी आता मोठी झाली आहे. त्यामुळे मी माझा निर्णय घेऊ शकते. मी आता काहीही करु शकते, असं श्रद्धा घर सोडताना म्हणाली होती. मात्र आजच्या युगाचा विचार करता, १८ वर्षांनंतरच्या स्वातंत्र्यावर बॅन आणण्याबाबत विचार करण्याची गरज असल्याची मागणी विकास वालकर यांनी केली आहे.

दिल्ली पोलीस आणि मुंबई पोलिसांचे काम व्यवस्थित सुरु आहे. वसई पोलिसांनी सहकर्य केले नाही. त्यांनी तक्रार दाखल झाल्यानंतर लगेच कारवाई केली असती, तर आज माझी मुलगी जिवंत असती. वसई येथील तुळीज पोलीस स्टेशन व मणिपूर पोलीस स्टेशन यांच्या काही असहकार्याच्या भूमिकेमुळे मला बराच त्रास सहन करावा लागला, असा आरोपही विकास वालकर यांनी यावेळी केला. त्यामुळे राज्य सरकार यावर कोणती भूमिका घेणार, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

आफताबची २ टप्प्यांत १० दिवस कसून चौकशी

श्रद्धाची हत्या केल्यानंतर तिचे शिर कुठे टाकून दिले, याचा शोध पोलीस घेत आहेत. यासंदर्भात एक तलावही रिकामा करण्यात आला. हरतऱ्हेने आफताबची चौकशी केली जात आहे. परंतु, पोलिसांना ठोस असे काहीच मिळत नसल्याचे म्हटले जात आहे. नार्को टेस्टनंतर आफताबकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांना असा कोणताही मोठा पुरावा मिळालेला नाही. जेणेकरून हे प्रकरण पुढे जाऊ शकेल. आफताबच्या चलाखीमुळे पोलिसांच्या हाती काही लागत नसून, पोलीस पुराव्यासाठी कठोर मेहनत घेताना दिसत आहेत. पोलिसांनी आफताबची आतापर्यंत दोन टप्प्यांमध्ये १० दिवस कसून चौकशी केली आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :Shraddha Walker Murder Caseश्रद्धा वालकरPoliceपोलिसDeathमृत्यू