उल्हासनगर : कॅम्प नं-४, आशेळेपाडा येथील चिकन विक्रत्याकडे दरमहा २ हजार रुपयांची मागणी करून त्याला मारहाण केल्याचा प्रकार उघड झाला. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
उल्हासनगर कॅम्प नं-४, आशेळेपाडा येथे हबीपूर मुन्सर मलिक यांचा चिकन विक्रीचा व्यवसाय आहे. परिसरातील गौतम गणेश वानखडे, रोहन उर्फ गोट्या झुंबर व ऐक अनोळखी साथीदार यानी संगणमत करूण रविवारी सायंकाळी मलिक यांच्या चिकन दुकानावर जाऊन बांबूने धाक दाखवत दरमहा २ हजार रुपयांच्या हप्त्याची मागणी केली. तसेच मलिक यांना शिवीगाळ, मारहाण करून दुकानाची तोडफोड केली. मलिक यांच्या तक्रारीवरून तिघा विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.