छत्तीसगडमधील बलरामपूर जिल्ह्यातील कुसमी येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. लग्नादरम्यान असं काही घडलं की पोलिसांनी थेट नवरदेवालाच बेड्या घातल्या. लग्न मंडपातून एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. आरोपीने लग्नाचं आश्वासन देऊन त्याच्या गर्लफ्रेंडशी अनेक वेळा शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर ती प्रेग्नेंट झाली.
तरुणाची गर्लफ्रेंड ५ महिन्यांची प्रेग्नेंट आहे. तरुणाला हे माहित होतं. तरीही, तो त्याच्या प्रेग्नेंट गर्लफ्रेंडला सोडून दुसऱ्या मुलीशी लग्न करण्याच्या तयारीत होता. गर्लफ्रेंडला हा धक्कादायक प्रकार समजतात तिने पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. यानंतर बलरामपूर जिल्ह्यातील कोरांधा पोलिसांनी आरोपीला मंडपातून अटक केली.
आरोपीचे तरुणीसोबत गेल्या ७-८ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. आरोपी तरुणाने मुलीला लग्नाचं खोटं आश्वासन दिलं आणि तिच्याशी अनेकदा शारीरिक संबंध ठेवले. तरुणी प्रेग्नेंट असल्याचं माहीत असूनही तरुण दुसऱ्या मुलीशी लग्न करण्याची तयारी करत होता. तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आणि या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.