शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

खासदार सावंतांचा पीए असल्याचे सांगत गंडा, ११ लाखांची फसवणूक; आरोपीला कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2024 14:29 IST

...नंतर  शेख याच्या मुलीला सुरजने शासकीय विधि कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून नऊ लाख २७ हजार रुपये उकळले. 

मुंबई :  शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांचा स्वीय सहायक असल्याची बतावणी करत कुलाब्यातील बडे मियाँ हॉटेलच्या मालकाची ११ लाख २७ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या सुरज कलव (३०) याच्या कोठडीत  १२ ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली आहे. कलव याने ठगीच्या पैशांतून मित्र, मैत्रिणींशी जीपेद्वारे आर्थिक व्यवहार केल्याचेही समोर आले आहे.बडे मिया हॉटेलचे मालक जमाल मोहम्मद यासीन शेख  यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अधिवेशन सुरू असताना २ जुलैच्या रात्री त्यांना सुरजने कॉल केला. त्याने सावंत यांचा पीए असल्याची बतावणी करत जेवण मागविले. सुरुवातीला वेळेत पैसेही दिले. कालांतराने जेवणाचे दोन लाख  थकविले आणि पैसे अधिवेशनानंतर देतो असे सांगितले. त्यानंतर  शेख याच्या मुलीला सुरजने शासकीय विधि कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून नऊ लाख २७ हजार रुपये उकळले. 

आर्थिक व्यवहारांची कसून चौकशीसुरजचे स्वतःचे बँक खाते नाही. त्याने केलेले सर्व आर्थिक व्यवहार मित्र, मैत्रीण तसेच  नातेवाइकांच्या खात्यांवर केल्याचे पोलिस तपासात समोर आले. फसवणुकीच्या पैशांतून त्याने मैत्रिणीला जीपेद्वारे ट्रान्सफर केलेले, तसेच मित्राला वाढदिवसानिमित्त दिलेले १ लाख १९ हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे. दुसरीकडे बारमध्ये ज्या बारगर्लवर त्याने पैसे उडवले तिची चौकशीही करण्यात येते आहे. कॉलेज प्रवेशासाठी रोख स्वरूपात घेतलेली रक्कम अद्याप पोलिसांच्या हाती लागलेली नसून याप्रकरणात आणखी कुणाचा सहभाग आहे का, हेदेखील पोलिस तपास करत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसfraudधोकेबाजी