शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक अडचणींची थाप मारून महिलेची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2021 11:21 IST

Crime News: आर्थिक अडचण असल्याची थाप मारून वस्तू खरेदी करायच्या असे सांगत दलालाने महिलेची साडेतीन लाखांची फसवणूक केली. हा प्रकार २०१८ पासून ऑगस्ट २०२१ पर्यंत सुरू होता.

औरंगाबाद : आर्थिक अडचण असल्याची थाप मारून वस्तू खरेदी करायच्या असे सांगत दलालाने महिलेची साडेतीन लाखांची फसवणूक केली. हा प्रकार २०१८ पासून ऑगस्ट २०२१ पर्यंत सुरू होता. हामेद अली खान रफत खान (रा. राहत कॉलनी, पं. स. कार्यालयामागे) असे फसवणूक करणाऱ्या दलालाचे नाव आहे.शहाबाजारातील ३१ वर्षीय महिलेची २०१८ मध्ये नातेवाइकांच्या एका कर्ज प्रकरणादरम्यान दलाल हामेद अली याच्याशी ओळख झाली. त्यानंतर हामेदने याने आपले सिव्हिल खराब आहे. त्यामुळे तुमच्या नावे कर्ज प्रकरण करू अशी महिलेला गळ घातली. त्यावेळी आर्थिक अडचण असल्याचे सांगत त्याने महिलेच्या नावे एका फायनान्स कंपनीतून १ लाख ७१ हजारांचे पहिले कर्ज उचलले. या कर्जाचे हप्ते नियमित भरल्यानंतर त्याने इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करायच्या आहेत, असे सांगत महिलेच्या नावे दुसऱ्या बँकेतून पुन्हा १ लाख २४ हजारांचे कर्ज उचलले. अशाच  पद्धतीने महिलेला आर्थिक अडचण असल्याचे सांगत तो वेगवेगळ्या फायनान्स कंपनी आणि बँकेतून महिलेच्या नावे कर्ज उचलायचा. काही महिने हप्त्यांची परतफेड केल्यानंतर अचानक त्याने हप्ते थकवले. हप्ते थकल्यामुळे बँक व फायनान्स कंपनीने महिलेकडे पैसे भरण्यासाठी तगादा सुरू केला. तेव्हा आपले सिव्हिल खराब होत असल्यामुळे हप्त्यांची परतफेड करा, असे महिलेने हामेद अलीला सांगितले. मात्र, हामेद अलीने हप्ते भरण्यास टाळाटाळ केली. 

३ लाख ५५,५०० रुपयांचे हप्ते थकवलेआरोपीने  एकंदरीत फायनान्स कंपनी आणि बँक यांचे ३ लाख ५५ हजार ५०० रुपयांचे हप्ते थकवले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावरून महिलेने अखेर सिटीचौक पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास उपनिरीक्षक सुभाष हिवराळे करत आहेत.

टॅग्स :fraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी