शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

दामदुप्पट योजनेद्वारे फसवणूक : इंदापुरात पती-पत्नीवर गुन्हा दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 18:36 IST

आमच्याकडे पैसे गुंतवल्यास पाच वर्षांत तुमचे पैसे दामदुप्पट करून देऊ, असे सांगणाऱ्या पती-पत्नींवर इंदापूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देचार वर्षे हप्तावसुली करून लुटले 

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना आम्ही विमा पीएसीएल कंपनीचे एजंट आहोत. आमच्याकडे पैसे गुंतवल्यास पाच वर्षांत तुमचे पैसे दामदुप्पट करून देऊ, असे सांगणाऱ्या पती-पत्नींवर इंदापूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत बाळासाहेब नामदेव गायकवाड (रा. आंबेडकरनगर) यांनी फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदापूर तालुक्यातील एका आश्रमशाळेत सहशिक्षकाची नोकरी करणारे तानाजी अण्णा चंदनशिवे व त्यांची पत्नी ललिता तानाजी चंदनशिवे (रा. वडापुरी, ता. इंदापूर)अशी गुन्हा दाखल झालेल्यांंची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी : इंदापूरमधील भीमाई आश्रमशाळा (इंदापूर) येथे कामाठी म्हणून काम करणारे बाळासाहेब गायकवाड यांना त्या शाळेतील सहशिक्षक तानाजी अण्णा चंदनशिवे यांनी सांगितले, की मी व माझी पत्नी ललिता पीएसीएल विमा कंपनीचे एजंट म्हणून काम करतो. त्यात तुम्ही गुंतवणूक केली तर ५ वर्षांमध्ये रक्कम दामदुप्पट  होईल. सुरुवातीला गायकवाड यांनी गुंतवणूक करण्यास नकार दिला. मात्र, चंदनशिवे यांनी सातत्याने पाठपुरवा करून त्यांच्याकडून ३ ऑक्टोबर २०१० पासून दरमहा ५५० रुपयांची गुंतवणूक करून घेतली. यासाठी यू १५१३१९३३६ असा खाते क्रमांक दिला. त्यानंतर २७/७/२०१४ रोजी एकूण ४० हप्त्यांचे २२ हजार रुपये तानाजी चंदनशिवे यांच्याकडे जमा झाले. त्यानंतर चंदनशिवे हप्ता न्यायला आलेच नाहीत. त्यामुळे गायकवाड यांनी चौकशी केल्यावर चंदनशिवेंनी सांगितले, की पीएसीएल कंपनीची कोर्टात केस चालू आहे; त्यामुळे सध्या व्यवहार बंद आहेत. केस संपताच पैसे मिळतील. त्यानंतरही सातत्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे अखेर मार्चमध्ये गायकवाड यांनी त्यांच्याविरुद्ध तक्रार दिली. त्यामुळे चंदनशिवे पती-पत्नींवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक सुशील लोंढे पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :IndapurइंदापूरCrime Newsगुन्हेगारीArrestअटकfraudधोकेबाजी