शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

"वृद्धांना तरुण करू"; टाईम मशीनच्या जाळ्यात अडकले हजारो लोक, जोडप्याकडून कोट्यवधींचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 10:49 IST

फसवणूक करणारे पती-पत्नी एका राऊंडच्या थेरपीसाठी सहा हजार रुपये घ्यायचे. त्यांनी भन्नाट फायदे सांगून लोकांना आपल्याकडे आकर्षित केलं होतं.

आपण अनेकदा चित्रपटांमध्ये नवनवीन भन्नाट गोष्टी या पाहत असतो. एखादी व्यक्ती जर वृद्ध होत असेल तर तरुण दिसेल असं सांगणाऱ्या मशीन्स देखील उपलब्ध असल्याचं दाखवलं जातं. पण हे खरं नसतं. मात्र आता अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याच संकल्पनेचा वापर करून कानपूरमधील एका जोडप्याने शहरातील हजारो लोकांना आपल्या जाळ्यात ओढलं. कोट्यवधी रुपयांची फसवणूक करून हे जोडपं आता पळून गेलं आहे.  

पीडित महिलेने आपले पैसे परत मिळवण्यासाठी आता पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. कानपूर पोलिसांनी या जोडप्याविरुद्ध एफआयआर नोंदवून शोध सुरू केला आहे. त्यांना पकडण्यासाठी रेड कॉर्नर नोटीसही जारी करण्यात येत आहे. कानपूरच्या गोविंदनगर भागात एक थेरपी सेंटर उघडण्यात आलं होतं, ज्यामध्ये वृद्धांना तरुण करण्यासाठी थेरपी दिली जाते असा प्रचार करण्यात आला. हे मशीन इस्रायलमधून मागवण्यात आल्याचं सांगितलं. 

मशीनच्या माध्यमातून ६० वर्षांच्या माणसाचं रूपांतर २५ वर्षांच्या तरुण मुलासारखं करण्यात येईल असं सांगण्यात येत होतं. रिव्हायव्हल वर्ल्ड नावाचे सेंटर उघडण्यात आले असून त्यात वृद्धांना नवसंजीवनी देणार असं सांगणारे पती-पत्नी हे या फसवणुकीचे मुख्य सूत्रधार होते. त्यांनी अनेक लोकांना फसवलं. खराब आणि प्रदूषित हवेमुळे लोक लवकर वृद्ध होतात. ऑक्सिजन थेरपी काही महिन्यांत त्यांना तरुण बनवते असं सांगितलं. 

फसवणूक करणारे पती-पत्नी एका राऊंडच्या थेरपीसाठी सहा हजार रुपये घ्यायचे. त्यांनी भन्नाट फायदे सांगून लोकांना आपल्याकडे आकर्षित केलं होतं. एक चेन सिस्टम तयार केली होती, ज्यामध्ये त्यांनी अधिक लोकांना जोडल्यास विनामूल्य उपचार देण्याची स्कीम देखील दिली. त्यांच्या जाळ्यात शहरातील मोठे लोक अडकले. ज्यांना त्यांनी नंतर कोट्यवधींचा गंडा घातला. पोलीस या दोघांच्या शोध घेत असून याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी