शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सात फेरे घेऊन तिने 18 जणांना घातला गंडा, लुटारू नवरीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या   

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2018 10:38 IST

विवाहेच्छुक तरुणांशी विवाहगाठ बांधून त्यांना गंडा घालणारी तरुणी आणि तिच्या टोळीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

लखनौ - विवाहेच्छुक तरुणांशी विवाहगाठ बांधून त्यांना गंडा घालणारी तरुणी आणि तिच्या टोळीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. छत्तीसगडमधील या टोळीची प्रमुख असलेली एक तरुणी तिचा कथित पती, एक साध्वी आणि अन्य दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. लग्न झाल्यानंतर बलात्कार, अपहरण आणि जबरदस्तीने विवाह केल्याची तक्रार करण्याची धमकी देऊन ही टोळी तरुणांना लुबाडत असे, असा या टोळीवर आरोप आहे. या टोळीची प्रमुख असलेल्या निर्मला ठाकूर हिने उत्तर प्रदेशातील बांदा येथील घनश्याम नावात्या तरुणासोबत 10 जुलै रोजी विवाह केला होता. या विवाहाच्या बदल्यात साध्वी मालती शुक्ला, ममता द्विवेदी आणि तिचा पती निरंजन द्विवेदी याने 50 हजार रुपये उकळले. या विवाहाला तीन दिवस उलटल्यानंतर निर्मलाचा कथित पती कुलदीप हा घनश्यामच्या घरी पोहोचला. तसेच निर्मलाचे अपहरण करून तिच्याशी जबरदस्तीने विवाह केल्याचा आरोप त्याने घनश्यामवर केला. तसेच दोन लाख रुपये न दिल्यास पोलिसांत तक्रार करण्याची धमकी दिली.  पण घनश्यामने पैसे देण्यास नकार दिल्यावर कुलदीपने घनश्याम आणि त्याच्या भावाविरोधात अपहरण आणि बलात्काराचा गुन्हा नोंदवला. त्यानंतर पोलिसांनी घनश्याम आणि त्याच्या भावाला अटक केली. ही बातमी पसरताच बांदा येथे राहणारे दिनेश पांडे यांनी पोलिसांकडे धाव घेतली. तसेच गेल्या महिन्यात मालती शुक्ला हिने एक लाख रुपये घेऊन त्यांचा विवाह निर्मला गिच्याशी करून दिल्याचे तसेच काही दिवसांनंतर निर्मला लाखो रुपयांचे दागिने घेऊन पसार झाल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी निर्मला आणि तिच्या साथीदारांची उलट तपासणी घेतली असता त्यांनी आपण 18 तरुणांना गंडा घातल्याचे कबूल केले.   

टॅग्स :Crimeगुन्हाmarriageलग्नWomenमहिला