शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीच्या आमिषाने १४० जणांची फसवणूक, ४८ लाख हडपले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2019 03:42 IST

सीमा शुल्क विभागात वरिष्ठ अधिकारी असल्याचे भासवून एका भामट्याने १४० जणांची फसवणूक केली आहे.

नवी मुंबई/पनवेल : सीमा शुल्क विभागात वरिष्ठ अधिकारी असल्याचे भासवून एका भामट्याने १४० जणांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी ४८ लाख रुपये घेऊन पलायन केलेल्या संतोष पाटील विरोधात गुरुवारी खारघरमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.खारघरच्या सेक्टर १५ मध्ये राहणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या योगिता कडू यांना फेब्रुवारी संतोष पाटील याने फोन केला. नोवाईक असल्याचे सांगून भेटण्यासाठी वेळ मागितली. भेटीत केंद्रीय सीमा शुल्क व उत्पादन शुल्क विभागामध्ये वरिष्ठ अधिकारी असल्याचे सांगितले. सीमा शुल्क विभागामध्ये कर्मचारी भरतीचे काम करत असून तुमच्या संपर्कात कोणी असल्यास त्याला माझा संपर्क नंबर द्या, असेही सांगितले. अधिकाºयाच्या वेशातच भेटण्यासाठी घरी आल्यामुळे व ओळखपत्रही दाखविल्यामुळे त्याच्यावर विश्वास बसला. योगिता यांना नोकरीची आवश्यकता आहे. याशिवाय पुतण्या अमर कडू, परेश कडू, राज कडू, याशिवाय परिचितांपैकी निमिता पाटील, नीलेश ठाकूर, अनिकेत पाटील, जयेश ठाकूर, लोचना पाटील, नयना ठाकूर, निकेत तांडेल, दिनेश पाटील, अक्षय म्हात्रे, संदीप म्हात्रे, संगिता विणेरकर यांनाही नोकरीची आवश्यकता आहे. त्यांना नोकरी मिळवून देता येईल का? अशी विचारणाही केली. पाटीलाने शिक्षणाप्रमाणे शिपाई, सुरक्षारक्षक, सीमा शुल्क अधिकारिपदावर नियुक्ती करण्यासाठी पदाप्रमाणे ३५००, १०५००, २५ हजार, ३५ हजार शुल्क भरावे लागतील, असे सांगितले.फेब्रुवारी ते आॅगस्ट २०१८ दरम्यान १४० जणांनी त्याच्याकडे तब्बल ४८ लाख रुपये जमा करत आवश्यक ती कागदपत्रेही सादर केली. ज्यांनी पैसे भरले त्यांना गणवेश व नामफलक देऊन त्या सगळ्यांना फोटो काढण्यास सांगितले. सर्वांची यादी करून ती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दाखविण्यासाठी पाटील घेऊन गेला. थोड्या दिवसांनी रिव्हाल्वर परवान्यासाठी पुन्हा १५ हजार ५०० रुपयांची मागणी केली. यामुळे सर्वांना संशय आला. त्याने दिलेली ओळखपत्र व नियुक्तीपत्राविषयी खात्री केली असता सर्व बोगस असल्याचे निदर्शनास आले. यामुळे या प्रकरणी गुरुवारी खारघर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.खोटी नियुक्ती पत्रेसंतोषने पैसे भरलेल्या जवळपास १४० जणांना खोटी नियुक्ती पत्रे दिली आहेत. सर्व्हिस बुक, मेडिकल कार्डही दिले होते. लवकरच या सर्वांची न्हावा-शेवा, ठाणे, दिघी, नागोठणे, नाशिक, देवळाली व इतर ठिकाणी नियुक्ती केली जाणार असल्याचे आश्वासन दिले होते. फेब्रुवारी, २०१८ पासून अनेकांकडून पैसे घेत होता. नोकरी लावण्यासाठी विलंब होत असल्याने सर्वांनी विचारणा करण्यास सुरुवात केली. तेव्हा मला १४ हजार जणांच्या नियुक्तीचे काम करायचे आहे. यामुळे विलंब होत असल्याचे सांगितले होते. मार्च, २०१९ नंतर त्याचे पाचही नंबर बंद लागले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी