शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. पायल तडवी आत्महत्याप्रकरणी ३ आरोपी डॉक्टरांविरोधी आरोपपत्र दाखल  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2019 17:48 IST

मुंबई गुन्हे शाखेने जवळपास २ हजार पानी आरोपपत्र विशेष न्यायालयात दाखल करण्यात आलं आहे.

ठळक मुद्देनायर रुग्णालयात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या डाॅ. पायल तडवीने २२ मे रोजी हाॅस्टेलमध्ये आत्महत्या केली होती. सुसाइड नोट पायलच्या मोबाइलमध्ये पोलिसांना आढळून आली होती. आरोपी डॉक्टर हेमा अहुजा, अंकिता खंडेलवाल, भक्ती मेहेर यांच्याविरोधात मुंबई गुन्हे शाखेने जवळपास २ हजार पानी आरोपपत्र विशेष न्यायालयात दाखल

मुंबई - डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणात आरोपी डॉक्टर हेमा अहुजा, अंकिता खंडेलवाल, भक्ती मेहेर यांच्याविरोधात मुंबई गुन्हे शाखेने जवळपास २ हजार पानी आरोपपत्र विशेष न्यायालयात दाखल करण्यात आलं आहे.

मुंबईतील बहुचर्चित डाॅ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जवळपास २ हजार पानी दोषारोपपत्र तयार केलं असून हे आरोपपत्र सत्र न्यायालयात सादर करण्यात आलं आहे. यात पायलच्या सुसाइड नोटचाही समावेश आहे. ही सुसाइड नोट पायलच्या मोबाइलमध्ये पोलिसांना आढळून आली होती. या प्रकरणी गुन्हे शाखेचे पोलीस अधिक तपास करत आहेत. 

 नायर रुग्णालयात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या डाॅ. पायल तडवीने २२ मे रोजी हाॅस्टेलमध्ये आत्महत्या केली होती. पायलच्या आत्महत्येचे पडसाद संपूर्ण राज्यभर उठले होते. पायलच्या आत्महत्येस कारणीभूत असणाऱ्या तिन्ही महिला डाॅक्टर हेमा अहुजा, भक्ती मेहर, अंकिता खंडेलवाल यांना आग्रीपाडा पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी हे प्रकरण मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याचे आदेश दिले. गुन्हे शाखेच्या पोलिसांना पायलच्या मोबाइलमध्ये तिने लिहिलेली ३ पानांची सुसाइड नोट आढळून आली. त्या सुसाइड नोटमध्ये तिने टोकाचं पाऊल उचलून आत्महत्या केल्याप्रकरणी कुटुंबांची आणि नवऱ्याची माफी मागितली आहे. या दोषारोपपत्रात पोलिसांनी ५० हून अधिक जणांचे जबाब नोंदवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. त्यात डाॅ. अहुजा आणि तडवीमध्ये झालेलं मोबाइल संभाषण, पायलसोबत शिक्षण घेणारे विद्यार्थी, पायलचे नातेवाईक, वरिष्ठ डाॅक्टरांचा जबाब हे महत्वाचे पुरावे पोलिसांनी दोषारोपत्रात सादर केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

 

 

टॅग्स :payal tadvi suicideपायल तडवीCourtन्यायालयPoliceपोलिसhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर