शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील सुरेंद्रनगरात गुंडांचा हैदोस : वाहनांची तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 21:54 IST

सुरेंद्रनगर गार्डनजवळ पार्क केलेल्या चार वाहनांची अज्ञात समाजकंटकांनी तोडफोड केली. गुरुवारी सकाळी ही संतापजनक घटना उघडकीस आल्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला.

ठळक मुद्देनागरिकांमध्ये दहशत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सुरेंद्रनगर गार्डनजवळ पार्क केलेल्या चार वाहनांची अज्ञात समाजकंटकांनी तोडफोड केली. गुरुवारी सकाळी ही संतापजनक घटना उघडकीस आल्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला.बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुरेंद्रनगरात (तात्या टोपेनगरातील गार्डनजवळ) संजय सदूजी सोमकुंवर राहतात. बुधवारी रात्री त्यांनी आणि त्यांच्या तीन शेजाऱ्यांनी आपापली वाहने घराच्या बाजूला उभी ठेवली. बुधवारी मध्यरात्री गार्डनजवळ दारूच्या नशेत तीन ते चार जणांमध्ये हाणामारी झाली. दरम्यान, कडाक्याची थंडी आणि पहाटेच्या वेळी झालेल्या जोरदार पावसामुळे नागरिक आपापल्या घरात दडून होते. गुरुवारी सकाळी सोमकुंवर आणि त्यांचे शेजारी जागे झाले असता त्यांना वाहनांची तोडफोड झालेली दिसली. समाजकंटकांनी एकूण चार कार फोडल्या. काहींच्या समोरच्या तर काही कारच्या मागच्या आणि साईडच्या काचा फोडण्यात आल्या होत्या. काचेच्या तुकड्यांचा सडा बघून समाजकंटकांनी काचांवर जड वस्तूचे अनेक फटके हाणल्याचे लक्षात येत होते. वाहनांच्या तोडफोडीचे वृत्त पसरताच परिसरातील नागरिकांनी तेथे गर्दी केली. एकाने नियंत्रण कक्षाला कळविले. त्यानंतर बजाजनगर पोलिसांचा ताफा तेथे पोहचला. पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी आजूबाजूच्या सीसीटीव्हीचे फुटेज ताब्यात घेतले. त्याआधारे आरोपींचा शोध सुरू करण्यात आला.मारहाण अन् आरोपीघटनास्थळाजवळ असलेल्या एका सीसीटीव्हीत आपसात हाणामारी करणारे तीन समाजकंटक आणि त्यानंतर एकाकडून झालेली वाहनांची तोडफोड कैद झाल्याचे समजते. पोलिसांनी याबाबत अधिक माहिती उघड केली नाही. मात्र, वाहनांची तोडफोड करणारा आरोपी पिवळ्या रंगाचा शर्ट घालून असल्याचे सांगितले जाते. सोमकुवर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर