शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

चंदा कोचर, धूत यांच्या घरांवर छापेमारी; मुंबई, औरंगाबादमध्ये 12 ठिकाणी शोधमोहीम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2019 00:12 IST

ईडीची मोठी कारवाई

मुंबई - आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक व विशेष कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांचे घर व कार्यालयावर सक्तवसूली संचलनालयाने (ईडी) आज छापेमारी केली. कर्ज गैरव्यवहार प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

मुंबई व औरंगाबाद 12 ठिकाणांवर रात्री उशीरापर्यंत शोध मोहिम राबवण्यात आल्याची माहिती पुढे येत आहे. त्यात कोचर यांचे पती व न्यू पॉवररिन्यूवेबलचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कोचर तसेच व्हिडिओकोन समुहाचे व्यवस्थापकीय संचालक व्ही. एन. धूत यांच्या संबंधीत ठिकाणांचाही समावेश आहे. याप्रकरणी सर्व आरोपींविरोधात लुक आऊट सर्कुलर जारी करण्यात आले होते. याप्रकरणी सकाळपासूनच ईडीने मुंबई व औरंगाबाद येथील 12 ठिकाणांवर छापे टाकून शोध मोहिम राबवली. गुन्ह्यांसंबीत पुरावे गोळा करण्यासाठी ही शोध मोहिम राबवण्यात आली. कोचर या आयसीआयसीआय बँकेच्या कार्यकारी संचालक आणि सीईओ असताना त्यांनी व्हिडीओकॉन कंपनीला पदाचा गैरवापर करत 3250 कोटींचं कर्ज दिले. हे कर्ज देताना कोचर यांनी व्यक्तिगत हित बघितलं आणि त्याचा फायदा घेतला असा त्यांच्यावर आरोप होता. उद्योगपती धूत व चंदा कोचर यांचे पती दिपक कोचर यांनी एकत्र येऊन न्यू पॉवर रिन्यूवेबल ही कंपनी स्थापन केली होती. त्या कंपनीच्या नावावर 64 कोटी रुपयांचे कर्ज घेण्यात आले होते. त्याशिवाय व्हीडीओकॉन ग्रुपच्या पाच कंपन्यांच्या नावावर तीन हजार 250 कोटी रुपयांचे कर्ज घेण्यात आले होते. त्यातील 86 टक्के रक्कम म्हणजेच दोन हजार 810 कोटी रुपये देण्यात आलेले नाही. त्यानंतर 2017 मध्ये या कर्जाला बुडीत घोषित करण्यात आले होते. 

 

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयraidधाडChanda Kochharचंदा कोचरICICI Bankआयसीआयसीआय बँक