शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

उघड्यावर ‘धुळवड’ साजरी करणे मद्यपींना पडले महागात, १५०हून अधिकांवर गुन्हे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 11:26 AM

सोमवारी रंगपंचमी साजरी करत उघड्यावर मद्यपान करणाऱ्या १५०हून अधिकांवर कारवाई करण्यात आली आहे.  

नवी मुंबई : होळीच्या अनुषंगाने पोलिसांनी खबरदारी घेत ठिकठिकाणी नाकाबंदी लावली होती. त्याशिवाय संशयित ठिकाणी धडक देऊन कारवाया केल्या जात होत्या. सोमवारी रंगपंचमी साजरी करत उघड्यावर मद्यपान करणाऱ्या १५०हून अधिकांवर कारवाई करण्यात आली आहे.  

परिमंडळ एकमध्ये उपायुक्त पंकज डहाणे, परिमंडळ दोनमध्ये उपायुक्त विवेक पानसरे व वाहतूक शाखा उपायुक्त तिरुपती काकडे यांच्या सूचनेनुसार स्थानिक पोलिसांकडून खबरदारी घेण्यात आली होती. त्यासाठी रविवारी रात्री होळी पेटल्यापासून ते सोमवारी संध्याकाळी धुळवडीचा रंग उतरेपर्यंत शहरात पोलिसांचा बंदोबस्त होता. यावेळी विविध कलमान्वये ६००हून अधिकांवर कारवाई करण्यात आल्या.

ड्रंक अँड ड्राइव्हच्या ४३ कारवाया मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाया केल्या जात होत्या. त्यानुसार सोमवारी सकाळी ते रात्री पर्यंत पोलिस आयुक्तालय क्षेत्रात ४३ वाहनांवर कारवाई केल्याचे उपायुक्त तिरुपती काकडे यांनी सांगितले.  २१ ते २४ मार्च दरम्यान ड्रंक अँड ड्राईव्हच्या एकूण ६३ कारवाया करण्यात आल्या आहेत.

मद्यविक्री केंद्राबाहेरच रंगल्या पंगतीसोमवारी सर्वत्र मोठ्या उत्साहात रंगपंचमी साजरी झाली. यादरम्यान रंगात रंगून गेलेल्या तळीरामांनी मोठ्या संख्येने मद्यविक्री केंद्राबाहेर गर्दी केली होती. झोपडपट्टी परिसरात धिंगाणा घालणाऱ्या तळीरामांना ताब्यात घेऊन गुन्हे दाखल केले आहेत.

गांजा विक्रेत्यांसह सेवन करणाऱ्यांवर कारवाईमागील दोन दिवसांत पोलिसांनी गांजाचे सेवन करणाऱ्यांसह विक्री करण्यासाठी आलेल्यांवर देखील कारवाया केल्या आहेत.खांदेश्वर पोलिसांनी अक्षय पांचाळ याच्याकडून १७ हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे. तर नेरुळ पोलिसांनी राहुल राठोड याच्याकडून १० हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे. सणाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्त अधिक ठेवण्यात आला होता.

सुरक्षारक्षकाला मारहाण  घणसोली येथील महानगर पालिकेच्या विभाग कार्यालय इमारतीच्या आवारात सोमवारी दुपारी काहीजण गांजाची नशा करत होते. त्यामुळे तिथले सुरक्षारक्षक बांगर यांनी नशा करणाऱ्या तरुणांना हटकण्याचा प्रयत्न केला.  याचा राग आल्याने तरुणांच्या टोळक्याने त्यांना मारहाण केली. याप्रकरणी रबाळे पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर एकाला ताब्यात घेतले असून इतरांचा पोलिस शोध घेत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी