शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
2
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
3
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
4
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
5
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
6
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
7
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
8
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
9
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
10
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
11
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
12
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
13
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
14
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
15
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
16
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
17
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
18
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
19
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
20
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...

उड्डाणपुलावर 'बर्थ डे' सेलिब्रेट करणं पडलं महागात, २१ जणांना अटक अन् ८ लग्जरी कारही जप्त; नेमकं काय घडलं पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2022 15:48 IST

उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील एका उड्डाणपुलावर गोंधळ आणि वाढदिवसाची पार्टी केल्याप्रकरणी २१ जणांना अटक करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील एका उड्डाणपुलावर गोंधळ आणि वाढदिवसाची पार्टी केल्याप्रकरणी २१ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून आठ आलिशान कारही जप्त करण्यात आल्या आहेत. इंदिरापुरम पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी मंगळवारी मध्यरात्री पूर्व दिल्लीतील जगतपुरी येथील अंश कोहली (२१) याचा वाढदिवस साजरा करत होते. आरोपी कारच्या बोनेटवर केक कापताना आणि मोठ्या आवाजात गाणी वाजवताना दिसले.

गाझियाबाद शहराचे पोलिस अधीक्षक ज्ञानेंद्र सिंह यांनी सांगितले की आरोपींनी सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या कार पार्क करून वाहतुकीला अडथळा आणला. यासोबतच तेथून जाणाऱ्या इतर प्रवाशांनाही त्यांनी अपशब्द वापरले. सर्व २१ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

व्हायरल झाला होता सेलिब्रेशनचा व्हिडिओगाझियाबादमध्ये तरुणांकडून उड्डाणपुलावर वाढदिवस साजरा आणि धिंगाणा घातला जात असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. गाझियाबाद पोलिसही अशा फोटो आणि व्हिडिओंवर सतत कारवाई करत आहेत. यासोबतच उड्डाणपुलांवर अशा घटना रोखण्यासाठी गाझियाबाद पोलिस अधिकाऱ्यांकडून दोन पीआरबीची ड्युटीही लावण्यात आली आहे. गाझियाबादमध्ये मंगळवारी रात्री अशाप्रकारे धिंगाणा आणि वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली. २१ तरुणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून ८ आलिशान गाड्याही जप्त करण्यात आल्या आहेत.

२१ तरुणांना अटकइंदिरापुरम पोलिस स्टेशनने उड्डाणपुलावर तैनात असलेल्या पीआरव्हीच्या माहितीवरून ही कारवाई केली आहे. अटक करण्यात आलेले सर्व तरुण आपला साथीदार अंश कोहलीचा वाढदिवस साजरा करण्यसाठी रहदारीच्या रस्त्यावर जमले होते आणि कार मधोमध पार्क करून धिंगाणा घालत होते. यातील २० तरुण दिल्लीतील वेगवेगळ्या भागातील आहेत, तर एक तरुण गाझियाबादच्या इंदिरापुरम भागातील आहे. त्याचवेळी दोन दिवसांपूर्वी उड्डाणपुलावर अशाच स्वरुपाचा धिंगाणा घालणाऱ्या ४ तरुणांना कोशांबी पोलिसांनी स्विफ्ट कारसह अटक केली होती.

पीआरव्ही टीम लक्ष ठेवणारसततच्या घटनांनंतर गाझियाबाद पोलिसांनी एलिव्हेटेड रोडवर दोन पीआरव्ही तैनात केले आहेत. त्याचबरोबर फ्लेक्सच्या माध्यमातून तरुणांना जागरुक करण्याचंही काम केलं जात आहे. एलिव्हेटेड रोडवर वाहन पार्क करणं, वाहनात मद्यपान करणं, वाढदिवस किंवा अन्य पार्टी करणं, सेल्फी घेणं, फोटोग्राफी करणं यांवर पोलिसांकडून कायदेशीर कारवाई केली जाईल, असं गाझियाबाद पोलिसांकडून स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश