शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील सर्व पोलीस ठाण्यात लागणार सीसीटीव्ही कॅमेरे !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2019 20:44 IST

कार्यवाहीसाठी ११० कोटीचा निधी मंजूर; उच्चाधिकार समितीचा हिरवा कंदील

ठळक मुद्दे ही योजना राबविण्यासाठी तब्बल ११० कोटीचा निधीला राज्य सरकारचा हिरवा कंदील मिळाला आहे. पहिल्या टप्यात मुंबईतील २५ पोलीस ठाण्यात प्रातिनिधीक स्वरुपात ही योजना राबविण्याची सूचना करण्यात आल्या होत्या.

जमीर काझी

मुंबई - पोलीस ठाण्यातील मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी त्याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची योजना आता लवकरच कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. राज्यातील सर्व पोलीस ठाण्यात ही योजना राबविण्यासाठी तब्बल ११० कोटीचा निधीला राज्य सरकारचा हिरवा कंदील मिळाला आहे. गेल्या चार वर्षापासून कासवगतीने सुरु असलेल्या या योजनेला आता गती मिळणार आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाला अतिरिक्त निधी देण्यास उच्चाधिकार समितीने नुकतीत मंजूरी दिली आहे, पहिल्या टप्यात ७२.६० कोटी मंजूर करण्यात आले होते. मात्र वाढत्या खर्चामुळे ते अपुरे ठरत असल्याने वाढीव ३७.४० कोटींना मंजूरी देण्यात आली असून येत्या काही महिन्यात राज्य पोलीस दलातील १० आयुक्तालये व ३६ अधीक्षक कार्यालयातर्गंत पोलीस ठाण्यात त्याची अंमलबजावणी केली जाईल, असे गृह विभागातील वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले.

राज्यातील पोलीस ठाण्यात आरोपी, फिर्यादी व नागरिकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत राहिले आहे, त्याला प्रतिबंध बसावा यासाठी लिओनार्ड वल्दारिस व इतर काहीजणांनी २०१४ रोजी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या खटल्यामध्ये ३० नोेव्हेंबर २०१६ रोजी दिलेल्या अंतिम निकालामध्ये न्यायालयाने यासंबंधी सर्वोच्च न्यायालयात डी. के. बसू यांनी दिलेल्या निकालाचा आधार देत राज्यातील सर्व पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आदेश दिले होते.

पहिल्या टप्यात मुंबईतील २५ पोलीस ठाण्यात प्रातिनिधीक स्वरुपात ही योजना राबविण्याची सूचना करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये प्रामुख्याने पोलीस ठाण्यातील कोठडी (लॉकअप), मार्गिका (कॉरीडॉर),चार्ज रुम, स्टेशन हाऊस याठिकाणी कॅमेरे बसविण्याचे होते. त्यांची अंमलबजावणी झाल्यानंतर मुंबईतील अन्य पोलीस ठाणे व प्रमुख महानगरातील पोलीस ठाण्यात कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला.त्यासाठी माहिती तंत्रज्ञान विभागाकडून निविदा जारी करण्यात आली. त्यासाठी २६ मार्च २०१८ रोजी गृह विभागाने ७२.८० कोटीचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र वाढीव खर्चामुळे ही रक्कम अपुरी पडल्याने ही योजना रखडली होती. त्यामुळे नव्या वाढीव खर्चानुसार एकुण ११० कोटी रुपयाच्या निधीची आवश्यकता असल्याने नव्याने प्रस्ताव सादर करण्यात आला होता. उच्चस्तरीय शक्ती प्रदान समितीने त्याला नुकतीच मंजुरी दिली आहे. त्यामुळे रखडलेल्या या कामाला लवकरच गती मिळणार आहे.राज्यात १२०० पोलीस ठाणीमहाराष्ट्रात १० पोलीस आयुक्तालय व ३६ अधीक्षक कार्यालये असून त्याअंतर्गत ऐकून १२०० वर पोलीस ठाणी कार्यरत आहेत. त्यापैकी प्रमुख महानगरातील बहुतांश पोलीस ठाण्यात त्यांची कार्यवाही झालेली आहे. मात्र ग्रामीण भाग, लहान पोलीस ठाण्यात त्याची कमतरता आहे. त्यामुळे आता गृह विभागाच्या आदेशानुसार या सर्व पोलीस ठाण्यामध्ये आवश्यक असलेल्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज बसविले.याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आवश्यकपोलीस ठाण्यातील लॉकअप रुम, प्रत्येक कॉरीडोर, स्टेशन हाऊस, चार्ज रुम याठिकाणी किमान पाच सीसीटीव्ही कॅमरे बसवावयाचे आहेत. पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक अभ्यागंत, फिर्यादी, पोलिसांनी पकडलेले संशयित, आरोपींचा त्याच्या कक्षेत असाव्यात, सीसीटीव्हीचे फुटेज सुरक्षितपणे संग्रही ठेवावयाचे आहेत.  

टॅग्स :cctvसीसीटीव्हीPoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबई