शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

छोटा राजनवरील ७१ पैकी १६ प्रकरणांत सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट काेर्टात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2021 06:20 IST

डिसेंबर २०१५ मध्ये छोटा राजनला अटक केल्यानंतर त्याचा ताबा सीबीआयकडे देण्यात आला. सर्व प्रकरणांचा तपास केल्यावर काही प्रकरणांत सीबीआयला राजनविरोधात पुरावे सापडले नाहीत

मुंबई : छोटा राजन याच्यावर नोंदविण्यात आलेल्या ७१ केसेसपैकी १६ केसेसमध्ये सीबीआयने विशेष न्यायालयात क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. या १६ केसेसपैकी किमान निम्म्या प्रकरणांत विशेष न्यायालयाने क्लोजर रिपोर्ट स्वीकारला आहे.

१९९९ च्या खंडणी व हत्या करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी छोटा राजनवर नोंदविलेल्या गुन्ह्याप्रकरणी सीबीआयने न्यायालयात क्लोजर रिपोर्ट दाखल केला. दोन आठवड्यांपूर्वी न्यायालयाने राजनविरोधात पुरावे नसल्याचे म्हणत हा क्लोजर रिपोर्ट स्वीकारला.जोगेश्वरी येथील एका गॅरेज मालकावर १२ ऑगस्ट १९९९ रोजी दुपारी गोळीबार करण्यात आला. त्याच्यावर गोळीबार करणाऱ्या अज्ञात व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलिसांनी मकोका अंतर्गत पाच जणांवर गुन्हा नोंदविला. त्यात छोटा राजनचाही समावेश होता.

डिसेंबर २०१५ मध्ये छोटा राजनला अटक केल्यानंतर त्याचा ताबा सीबीआयकडे देण्यात आला. सर्व प्रकरणांचा तपास केल्यावर काही प्रकरणांत सीबीआयला राजनविरोधात पुरावे सापडले नाहीत. त्या प्रकरणांत सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दाखल केला.छोटा राजन आतापर्यंत ज्येष्ठ पत्रकार डे यांच्या हत्येप्रकरणी व व्यावसायिक बी. आर. शेट्टी हत्येप्रकरणात दोषी आढळला आहे. डे हत्येप्रकरणी न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सध्या तो तिहार कारागृहात आहे.

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभागChhota Rajanछोटा राजन