शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

सुशांतप्रकरणी कूपरमधील डॉक्टरची सीबीआयकडून पुन्हा कसून चौकशी, वैद्यकीय अहवालाची एम्स रुग्णालय करणार पडताळणी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2020 21:14 IST

Sushant Singh Rajput Suicide case : एका पथकाने वॉटर सॅन्टार रिसॉर्ट येथे जाऊन सुशांतच्या वास्तव्याबद्दल माहिती जाणून घेतल्याचे सूत्रांच्याकडून सांगण्यात आले. 

ठळक मुद्दे सीबीआयची विविध पाच पथकांनी गेल्या चार दिवसांपासून या प्रकरणाची पाळेमुळे शोधून काढण्यावर भर दिला आहेसीबीआयचे एक पथक वॉटर सेटोन रिसॉर्ट येथे जाऊन तपासणी केली. या ठिकाणी सुशांत हा रिया चक्रवर्तीसह दोन महिने थांबला होता.

मुंबई : सुशांत सिंग राजपूत आत्महत्याप्रकरणी सीबीआयने सोमवारी कूपर रुग्णालयात शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टराकडे पुन्हा कसून चौकशी केली गेली. त्याचप्रमाणे सुशांतचे वैद्यकीय अहवाल दिल्लीच्या एम्स रुग्णालयात पाठविण्यात आले असून त्यांच्याकडून पडताळणी केली जाणार आहे. दरम्यान, एका पथकाने वॉटर सॅन्टार रिसॉर्ट येथे जाऊन सुशांतच्या वास्तव्याबद्दल माहिती जाणून घेतल्याचे सूत्रांच्याकडून सांगण्यात आले. 

सीबीआयची विविध पाच पथकांनी गेल्या चार दिवसांपासून या प्रकरणाची पाळेमुळे शोधून काढण्यावर भर दिला आहे. पहिल्या टप्यात सर्व प्रथमदर्शनी साक्षीदाराचे सविस्तर जबाब नोंदविले आहेत. त्यामध्ये सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानी, घरातील नोकर नीरज सिंग, दीपक सावंत यांच्याकडे कसून चौकशी केली आहे. त्यानंतर मृतदेहाचे विच्छेदन करणाऱ्या कूपर रुग्णालयातील डॉक्टराचा पुन्हा सोमवारी जबाब नोंदविण्यात आला. पोस्टमॉर्टेम लवकर करून देण्याबाबत मुंबई पोलिसांनी कोणत्या सूचना केल्या होत्या, पोस्टमॉर्टेम करताना कोणती खबरदारी घेतली, कोविड-19 रिपोर्ट चाचणी घेतली का?, याबाबत डॉक्टराकडून सखोल माहिती घेण्यात आली. त्याचप्रमाणे पोस्टमॉर्टेम करताना त्याच्या  व्हिडीओ शुटिंग, वैद्यकीय अहवालाच्या प्रती पथकासमवेत असलेल्या फॉरेन्सिक एक्सपर्टने  ताब्यात घेतल्या, त्या पुन्हा तपासणीसाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयाच्या बोर्डाकडे पाठविण्यात आल्या असल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, सीबीआयचे एक पथक वॉटर सेटोन रिसॉर्ट येथे जाऊन तपासणी केली. या ठिकाणी सुशांत हा रिया चक्रवर्तीसह दोन महिने थांबला होता. याठिकाणी 22 व 23 नोव्हेंबरला त्याने आध्यात्मिक रोग बरे करणाऱ्या बाबाला बोलाविल्याची माहिती समोर आली आहे. अधिकाऱ्यांनी क्लबच्या प्रशासनाकडून सुशांतचे तेथील वास्तव्य, त्याच्याशी केलेला आर्थिक व्यवहार, वर्तणूक आदीबाबत जबाब घेऊन कागदपत्रे ताब्यात घेतली.  आर्थिक बाबींची पडताळणी सुरुसीबीआयने सुशांत सिहची बँक खाती, ठेवी,  आर्थिक व्यवहार आणि आयटीआरसंबधी कागदपत्रे मुंबई पोलीस व ईडीकडून मागवून घेतली आहेत. त्याचबरोबर त्याच्या सीएला चौकशीसाठी समन्स पाठविले असून मंगळवारी त्याची, माजी व्यवस्थापक श्रुती मोदी यांच्याकडे चोकशी केली जाणार असल्याचे समजते.सीबीआयकडून सुशांत सिंह मृत्यूसंबधी सर्व संबधितांचे जबाब, चौकशी आणि पंचनामे करण्यात येत आहेत. ते  पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणातील मुख्य संशयित अभिनेत्री रिया चक्रवर्तीसह तिच्या कुटुंबाकडे तपास वळविला जाईल. त्यांना चौकशीसाठी पथक उतरलेल्या डीआरओच्या गेस्ट हाऊसमध्ये पाचारण केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, रिया किंवा तिच्या कुटूंबियांना चौकशीसाठी सीबीआयकडून कोणतेही समन्स बजाविण्यात आलेले नाही, असे तिच्या वकिलाकडून सांगण्यात आले आहे.  

 

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

मोठी बातमी! महाड तालुक्यात पाच मजली इमारत कोसळली, अनेकजण अडकल्याची भीती

 

पत्नी सेक्स करू देत नसल्याने पतीने केली आत्महत्या, पोलिसात गुन्हा दाखल

 

 

चिमुकल्या मुलींसह आईने स्वत:ला संपविले, राजापूर तालुक्यातील रायपाटण येथील दुर्घटना

 

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात मुंबई पोलीस बॅकफूटवर; जाणून घ्या, सीबीआय कसा करणार तपास?

 

सीबीआय तपासाची चक्रं जोरात फिरली, टीम सुशांत राजपूतच्या घरी या व्यक्तींसोबत पोहोचली!

 

'तबलिघी जमात'ला बनवलं बळीचा बकरा, FIR रद्द करण्याचे दिले कोर्टाचे आदेश

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतSuicideआत्महत्याPoliceपोलिसCBIगुन्हा अन्वेषण विभागRhea Chakrabortyरिया चक्रवर्तीhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर