शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

काश्मिरातील वीज प्रकल्प घोटाळ्याप्रकरणी मुंबईत CBI चे छापे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2022 06:43 IST

देशभरात १६ ठिकाणांवरही कारवाई, २२०० कोटी रुपयांची ही कंत्राट प्रक्रिया नियमबाह्य झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर जम्मू-काश्मीर सरकारने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून यासंदर्भात चौकशी करून अहवाल मागवला होता.

मुंबई : जम्मू-काश्मीरमधील किरू वीज प्रकल्पाच्या कामाचे कंत्राट नियमबाह्य पद्धतीने दिल्याप्रकरणी सीबीआयने बुधवारी मुंबईसह नवी दिल्ली, जम्मू, श्रीनगर, पाटणा या पाच शहरांत १६ ठिकाणी छापेमारी केली. या प्रकल्पाशी संबंधित आयएएस अधिकारी नवीनकुमार चौधरी यांच्यासह चार उच्चपदस्थ सरकारी अधिकारी आणि खासगी कंपनीवर ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणात घोटाळा झाला असून सीबीआय चौकशी करण्याची मागणी जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केली होती. 

उपलब्ध माहितीनुसार, किरू वीज प्रकल्पाचे कंत्राट देताना ती प्रक्रिया ई-टेंडरिंग पद्धतीने होणे अपेक्षित होते. मात्र, यासंदर्भात निर्णय घेणारे चिनाब व्हॅली पॉवर प्रोजेक्ट लि. कंपनीचे तत्कालीन अध्यक्ष नवीनकुमार चौधरी यांनी ती प्रक्रिया न राबविता पटेल इंजिनिअरिंग लि. या खासगी कंपनीला कंत्राट दिले. 

२२०० कोटी रुपयांची ही कंत्राट प्रक्रिया नियमबाह्य झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर जम्मू-काश्मीर सरकारने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून यासंदर्भात चौकशी करून अहवाल मागवला होता. या अहवालात हे कंत्राट नियमबाह्य पद्धतीने झाल्याच्या माहितीवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर त्या राज्य सरकारने याप्रकरणी सीबीआयने अधिक चौकशी करण्याची मागणी केली होती. याची दखल घेत सीबीआयने याप्रकरणी सीबीआयने २० एप्रिल २०२२ रोजी दोन स्वतंत्र एफआयआर दाखल केले. त्यावेळी केलेल्या कारवाईत एका एजंटच्या माध्यमातून कंपनीच्या वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांसोबत आर्थिक व्यवहार झाल्याची माहिती पुढे आली. 

याच तपासाचा भाग म्हणून बुधवारी मुंबईसह १६ ठिकाणी सीबीआयने छापे टाकले. याप्रकरणी आता कंपनीचे तत्कालीन अध्यक्ष नवीनकुमार चौधरी (आयएएस), एम.एस. बाबू, (तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक), एम. के. मित्तल (तत्कालीन संचालक), अरुण कुमार मिश्रा (तत्कालीन संचालक) तसेच कंत्राट प्राप्त पटेल इंजिनिअरिंग कंपनीचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभाग