शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Sushant Singh Rajput Case : सीबीआयकडून रियाची सलग दुसऱ्यादिवशी सात तास कसून चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2020 23:48 IST

Sushant Singh Rajput Case : आर्थिक देवाणघेवाण, ड्रगसेवनाबाबत सखोल विचारणा, आजी माजी सीए, शोविक, पिठानीकडे चौकशीचा फेरा कायम

ठळक मुद्देसांताक्रुज येथील डीआरडीओ गेस्ट हाऊसमध्ये शनिवारी दुपारपासून रात्री पावणे नऊपर्यंत चौकशी करण्यात आली.

मुंबई - सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणातील प्रमुख संशयित अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिची सीबीआयच्या पथकाने सलग दुसऱ्यादिवशी आठ तासाहून अधिक काळ चौकशी केली. सांताक्रुज येथील डीआरडीओ गेस्ट हाऊसमध्ये शनिवारी दुपारपासून रात्री पावणे नऊपर्यंत चौकशी करण्यात आली. मात्र, अद्याप चौकशी पूर्ण न झाल्याने तिला रविवारीही बोलाविण्याची शक्यता आहे.

तिच्यासह  तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती,  सुशांतचे आजी माजी  सीए श्रीधर आणि रजत मेवानी,  मॅनेजर  सॅम्युअल मिरांडा, सिद्धार्थ पिठानी , नोकर दीपेश सावंत व नीरज सिंग यांच्याकडेही चौकशीचा फेरा कायम ठेवण्यात आला आहे. सुशांतच्या पैशाचा त्यांच्याकडून झालेला वापर, 15 कोटी रक्कम वर्ग केल्याबद्दल विचारणा करण्यात आली. काहीवेळा सर्वांना  समोरासमोर बसवून त्याच्याकडून प्रश्नातरे  करण्यात आल्याचे सूत्राकडून सांगण्यात आले. 

शुक्रवारी रियाकडे दहा तास चौकशी करून सोडण्यात आले होते. शनिवारी तिला पुन्हा पाचारण करण्यात आले. मात्र तिला व तिच्या कुटूंबियांना धोका असल्याच्या शक्यतेने सीबीआयने त्यांना पोलीस बंदोबस्त पुरविण्याची सूचना मुंबई पोलिसांना केली होती. त्यानुसार त्यांना एक पोलीस एस्कॉट पुरविण्यात आले आहे. शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास  बंदोबस्तासमवेत रिया डीआरडीओच्या कार्यालयात पोहचली. तिच्याकडे  सुशांतने केलेला आर्थिक व्यवहार, खर्च आणि ड्रगसेवनाबाबत सविस्तर विचारणा करण्यात येत होती.रात्री पावणे नऊपर्यंत चौकशी सुरु होती. एसपी नूपुर प्रसाद आणि तीन इंस्पेक्टर रियाची चौकशी करत आहेत. तर एसपी अनिल यादव हे शोविक चक्रवतीची चौकशी करत असल्याचे सांगण्यात आले. 

शुक्रवारी रियाला विचारण्यात आलेले  प्रश्न असे -  *८ जूनला घर सोडून जाण्याचे कारण काय?* ८ ते १४ जूनपर्यंत त्याच्याशी संपर्क केला होता का?  का केला नाही?* त्याच्या मेसेजला का रिप्लाय दिला नाहीस? मोबाईल नंबर ब्लॉक का केला होता?*सुशांतला  तू कोणते ड्रग्स द्यायची? *सुशांतला कोणता आजार होता?*त्याला  उपचारासाठी तू सुशांतला कोणत्या डॉक्टरकडे नेलं? *सुशांतच्या आजाराबाबत त्याच्या घरच्यांना का नाही सांगितलं? * सुशांतला दिलेले ड्रग कोण पुरवायचे?

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

Sushant Singh Rajput Suicide : ड्रग्ज कनेक्शनबाबत भाजपा नेते राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिले पत्र 

 

 

सुशांत आत्महत्येच्या तपासातील पोलीस अधिकाऱ्याला कोरोना; CBI पथकाचीही होणार टेस्ट

 

संदीप सिंहच्या चौकशीसाठी आलेल्या तक्रारी सीबीआयकडे पाठवणार, अनिल देशमुखांनी दिली माहिती 

टॅग्स :Rhea Chakrabortyरिया चक्रवर्तीSushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतCBIगुन्हा अन्वेषण विभागSuicideआत्महत्या