शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
3
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
4
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
7
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
8
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
9
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
10
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
11
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
12
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
13
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
14
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
15
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
16
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
17
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
18
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
19
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
20
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?

Narada Scam: सीबीआयने तृणमूलच्या दोन मंत्र्यांसह चार नेत्यांना ताब्यात घेतले; मागोमाग ममतादेखील पोहोचल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2021 11:33 IST

One minister to face arrest of West bengal by CBI: काही दिवसांपूर्वीच राज्यपाल जगदीप धनखड यांनी नारदा स्टिंग प्रकरणी फिरहाद हकीम, सुब्रत मुखर्जी, मदन मित्रा आणि सोवन चटर्जी यांच्याविरोधात खटला चालविण्यासाठी परवानगी दिली आहे. नारदा स्टिंगचा व्हिडीओ समोर आल्यावेळपासून हे नेते ममतांच्या सरकारमध्ये मंत्री होते. राज्यपालांनी निवडणूक संपताच तातडीने या नेत्यांवरील कारवाईला मंजुरी दिली होती. 

विधानसभा निवडणुक संपून पश्चिम बंगालमध्येममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचे पुन्हा सरकार स्थापन होताच पुन्हा हाय व्होल्टेज ड्रामा सुरु झाला आहे. ममतांचे सरकार स्थापन होताच, त्यांच्या मंत्र्यांविरोधात नारदा घोटाळ्याची (Narada sting case) पुन्हा चौकशी सुरु झाली आहे. या घोटाळ्यातील आरोपी आणि ममतांचे कॅबिनेट मंत्री फिरहाद हकीम, सुब्रत मुखर्जी आणि आमदार मदन मित्रांसह भाजपाचे माजी नेते सोवन चटर्जी यांच्या घरावर सीबीआयने (CBI) छापेमारी केली आहे. या नंतर चारही नेत्यांना सीबीआयने कार्यालयात नेले आहे. हे समजताच मुख्यमंत्री ममता बॅनर्जीदेखील सीबीआय कार्यालयात दाखल झाल्या आहेत. (The Central Bureau of Investigation (CBI) arrested ministers Firhad Hakim and Subrata Mukherjee, TMC MLA Madan Mitra, and former Kolkata Mayor Sovan Chattopadhyay in the Narada bribery case on Monday.)

तृणमूल काँग्रेसच्या चारही नेत्यांना सीबीआयने ताब्यात घेतल्याचे समजताच बंगालच्या राजकारणात भूकंप आला आहे. नेत्यांच्या समर्थनार्थ आंदोलन सुरु झाले आहे. यातच ममता या सीबीआय कार्यालयात गेल्या आहेत. या साऱ्या घडामोडींमध्ये सीबीआयचे अधिकारी ममतांच्या मंत्र्यांची चौकशी करत आहेत. सीबीआयच्या टीमने सोमवारी सकाळी परिवाहन मंत्री आणि कोलकाता नगर पालिकेचे अध्यक्ष फिरहाद हकीम यांच्या घरावर छापा टाकला. थोडा वेळ शोध घेऊन हकीम यांना सीबीआयने उचलले. तेव्हा हकीम यांनी आपल्याला नारदा घोटाळ्यात अटक केले जात असल्य़ाचे सांगितले. यामुळे त्यांच्या समर्थकांनी हकीम यांच्या घरासमोर आंदोलन करण्यास सुरुवात केली. 

दुसरीकडे सीबीआयच्या टीमने सुब्रत मुखर्जी आणि मदन मित्रा यांना देखील त्यांच्या निवासस्थानावरून ताब्यात घेतले आहे. याचबरोबर भाजपाचे माजी नेते सोवन चटर्जी यांच्या घरीदेखील सीबीआयने छापा मारला. सोवन चटर्जी यांनी विधानसभा निवडणुकीआधी तृणमूलमधून भाजपात प्रवेश केला होता. मात्र, तिकिट न मिळाल्याने त्यांनी भाजपा सोडली होती. सीबीआयने अटकेच्या वृत्ताचा केला इन्कारया चारही नेत्यांना नारदा घोटाळ्यात चौकशीसाठी सीबीआय़ कार्यालयात आणण्यात आले आहे, या चारही नेत्यांना प्रश्न विचारले जाणार आहेत. मात्र, त्यांना अटक केली नसल्याचे सीबीआयने म्हटले आहे. काही दिवसांपूर्वीच राज्यपाल जगदीप धनखड यांनी नारदा स्टिंग प्रकरणी फिरहाद हकीम, सुब्रत मुखर्जी, मदन मित्रा आणि सोवन चटर्जी यांच्याविरोधात खटला चालविण्यासाठी परवानगी दिली आहे. नारदा स्टिंगचा व्हिडीओ समोर आल्यावेळपासून हे नेते ममतांच्या सरकारमध्ये मंत्री होते. राज्यपालांनी निवडणूक संपताच तातडीने या नेत्यांवरील कारवाईला मंजुरी दिली होती. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीCBIगुन्हा अन्वेषण विभागwest bengalपश्चिम बंगाल