शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

शीना बोरा प्रकरणाचा तपास पूर्ण, सीबीआयने विशेष न्यायालयाला दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2021 08:52 IST

Sheena Bora murder case: सीबीआयने आतापर्यंत मुख्य दोषारोपपत्र व त्यानंतर दोन पुरवणी दोषारोपपत्र दाखल केले. त्यात शीनाची आई इंद्राणी मुखर्जी, तिचा ड्रायव्हर श्यामवर राय, इंद्राणीचा दुसरा पती संजीव खन्ना आणि पीटर मुखर्जी हे आरोपी आहेत.

मुंबई : शीना बोरा हत्याकांडाचा २०१५ पासून सुरू असलेला तपास पूर्ण झाल्याची माहिती सीबीआयने विशेष न्यायालयाला मंगळवारी दिली. गेली सहा वर्षे सीबीआय या प्रकरणाचा तपास करत होती. यामध्ये शीनाची आई इंद्राणी मुखर्जी ही मुख्य आरोपी आहे.सीबीआयने आतापर्यंत मुख्य दोषारोपपत्र व त्यानंतर दोन पुरवणी दोषारोपपत्र दाखल केले. त्यात शीनाची आई इंद्राणी मुखर्जी, तिचा ड्रायव्हर श्यामवर राय, इंद्राणीचा दुसरा पती संजीव खन्ना आणि पीटर मुखर्जी हे आरोपी आहेत.२०१२ मध्ये २५ वर्षीय शीनाची हत्या केल्याप्रकरणी इंद्राणीला २०१५ मध्ये अटक करण्यात आली. त्यानंतर तीन महिन्यांत पीटर मुखर्जीला अटक करण्यात आली. शीनाची हत्या करण्यात इंद्राणीला मदत केल्याचा आरोप पीटरवर आहे.२०१२ मध्ये झालेली हत्या २०१५ मध्ये इंद्राणीचा ड्रायव्हर श्यामवर राय याला अन्य एका प्रकरणी अटक केल्यावर उजेडात आली.शीनाची हत्या इंद्राणीने श्यामवर राय व दुसरा पती संजीव खन्ना यांच्या मदतीने केली.पीटरच्या पहिल्या पत्नीचा मुलगा राहुल व शीना यांचे प्रेम इंद्राणीला खटकत होते. शीनाची हत्या केल्यावर इंद्राणीने शीनाच्या मैत्रिणीला ती अमेरिकेत राहायला गेल्याचे सांगितले, असे सीबीआयचे म्हणणे आहे. श्यामवर रायने पोलिसांना दिलेल्या कबुलीजबाबत शीनाचा मृतदेह पनवेल येथील जंगलात पुरल्याचे उघडकीस आले. शीना आणि इंद्राणीमध्ये आर्थिक व्यवहारावरून वाद झाल्याने शीनाने इंद्राणीचे बिंग फोडण्याची धमकी दिली. कारण इंद्राणी शीना आपली बहीण असल्याचे सर्वांना सांगत होती.

आतापर्यंत ६० साक्षीदारांचे जबाब नोंदवले- या प्रकरणाचा खटला २०१७ मध्ये सुरू झाला आणि आतापर्यंत ६० साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.दरम्यान, कारागृहातच असताना इंद्राणी आणि पीटरने त्यांचे १७ वर्षांचे पती-पत्नीचे नाते संपवले. २०१९ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. पीटरची गेल्या वर्षी जामिनावर सुटका करण्यात आली, तर इंद्राणी अद्याप कारागृहात आहे.

टॅग्स :Courtन्यायालयCrime Newsगुन्हेगारी