शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

लाच स्वीकारताना दोन जीएसटी अधिक्षक सीबीआयच्या जाळ्यात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2019 21:33 IST

सेवा कर कमी करून देण्यासाठी एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना जीएसटी विभागाच्या पुणे कार्यालयातील दोन अधिक्षकांना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) पथकाने रंगेहाथ पकडले.

पुणे : सेवा कर कमी करून देण्यासाठी एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना वस्तू व सेवा कर (जीएसटी) विभागाच्या पुणे कार्यालयातील दोन अधिक्षकांना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) पथकाने रंगेहाथ पकडले. यानंतर घराच्या झडतीत एका अधिक्षकाच्या घरात तब्बल २० लाख रुपयांची रोकड सापडली. दोघांनाही न्यायालयाने तीन दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली. विवेक देकाते (वय ४६) आणि संजीव कुमार (वय ३६) अशी अटक करण्यात अधिक्षकांची नावे आहेत. त्यांच्यावर संगनमताने लाचखोरी करणे व कट रचण्याच्या कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. खोपोली ते खालापूर येथील एका हॉटेलचा २०१६-१७ मधील सेवा कर कमी करून देण्यासाठी दोघा अधिक्षकांनी तीन लाख रुपयांची मागणी केली होती. याबाबत हॉटेल व्यावसायिकाने सीबीआयकडे तक्रार केली. तक्रारदार व अधिक्षकांची भेट झाल्यानंतर तिथे त्यांनी पाच लाखाची मागणी करून तीन लाख देण्यास सांगितल्याच्या ध्वनीफितीद्वारे लाच मागितल्याची खात्री केली. त्यानंतर सापळा रचला. ठरलेल्या रकमेतील पहिला हप्ता म्हणून एक लाख रुपये संजीव कुमार यांनी स्वीकारला. यावेळी विवेक देकाते हेही तिथे हजर होते. दोघांनाही लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.त्यानंतर सीबीआय पथकाने त्यांची कार्यालये व घराची झडती घेतली. त्यामध्ये एका अधिक्षकाच्या घरात २० लाख रुपयांची रोकड आढळून आली. त्यांच्याकडून काही कागदपत्रे, अन्य साहित्यही जप्त करण्यात आले आहे. दरम्यान, दोघांनाही सीबीआय न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर न्यायाधीश प्रल्हाद भगुरे यांनी त्यांना तीन दिवस सीबीआय कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. अ‍ॅड. सुधीर शहा यांनी न्यायालयात अधिक्षकांची बाजू मांडत कोठडी न देण्याची मागणी केली. सीबीआयचे वकील मनोज चलादान यांनी दोघांची पोलिस कोठडीची मागणी केली.  

टॅग्स :PuneपुणेGSTजीएसटीCorruptionभ्रष्टाचारCBIगुन्हा अन्वेषण विभाग