शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

५ किलो लाडूचा हट्ट नडला, पोलीस कर्मचारी कोट्यधीश निघाला; CBI अधिकारी हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2021 09:42 IST

तक्रारदार त्यागी मनोज आणि मित्र अनुजविरोधात २३ ऑगस्टला मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी देण्याची तक्रार झाली होती

नवी दिल्ली – मागील काही दिवसांपासून केंद्रीय तपास यंत्रणा CBI च्या निशाण्यावर दिल्लीतील भ्रष्ट पोलीस अधिकारी आहेत. दिल्लीत CBI ने अशा पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरावर छापे मारले. काही दिवसांपूर्वी CBI नं एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला लाच घेताना अटक केली. हे प्रकरण थंड होत नाही तोवर CBI टीमनं एका पोलीस अधिकाऱ्यावर धाड टाकली. हा अधिकारी ५ लाख वसुली करण्यासाठी हट्ट करुन बसला होता.

पीडितांसोबत डील झाल्यानंतर उपनिरीक्षकाने मोबाईलवर बोलताना लाचेच्या ५ लाख रुपयाला ५ किलो लाडू कोडवर्क दिलं होतं. म्हणजे सीबीआय अथवा कुणीही मोबाईल रेकॉर्डिंग तपासलं असता त्यांना समजणार नाही. किंवा पकडलं गेलं तरी कुणीही सिद्ध करु शकणार नाही यासाठी दिशाभूल करण्यासाठी त्याने कोडवर्ड ठेवला. या अधिकाऱ्याचं नाव भोजराज असं आहे. CBI ने भोजराज सिंहला लाच घेताना रंगेहाथ पकडलं. भोजराज दक्षिणी दिल्लीच्या मैदान गढी पोलीस ठाण्यात कार्यरत होता.

५ किलो एकटा थोडी खाणार

लाच घेण्याच्या आरोपात अटकेत असलेला उपनिरीक्षक भोजराज सिंह याला सीबीआयनं अटक केली. सूत्रांच्या माहितीनुसार, पीडित व्यक्तीसोबत झालेल्या डीलनुसार संवादात ५ किलो लाडू एकटा थोडी खाणार. यातील काही लाडू साहेबांना मिळणार. आता हा साहेब कोण आहे? लाचेच्या रक्कमेत कुणाची भागीदारी होती. याचाही शोध CBI कडून घेतला जाणार आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

CBI प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अधिकाऱ्याच्या घरावर छापे मारले असते त्याठिकाणी १ कोटी  १२ लाख रुपये रोकड सापडली. तक्रारदार त्यागी मनोज आणि मित्र अनुजविरोधात २३ ऑगस्टला मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी देण्याची तक्रार झाली होती. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक भोजराज सिंह करत होते. हनीने २६ ऑक्टोबरला CBI मध्ये तक्रार देत जामीन अर्जाचा विरोध न करण्यासाठी भोजराज सिंह यांनी ५ लाखाची लाच मागितली असा आरोप केला. त्यानंतर २ लाख रुपये देण्यास तक्रारदार मान्य झाला. २ लाखाच्या बदल्यात पोलिसांनी आरोपींविरोधात कोर्टात ठोस बाजू मांडू नये असं ठरलं होतं. CBI ने तक्रारदार आणि पोलीस कर्मचारी यांच्यातील फोन संवाद ऐकला. त्यानंतर रक्कमेसाठी लाडू आणि साखर कोडवर्डचा वापर करण्यात आला. ५ किलो लाडूची सोय करा असं भोजराज सिंहने लाचेच्या स्वरुपात मागितले होते.

टॅग्स :delhiदिल्लीCBIगुन्हा अन्वेषण विभाग