शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

मास्क आणि काळा चष्मा लावून 'ती' ज्वेलरी शॉपमध्ये आली, 10 लाखांचा नेकलेस चोरून गेली अन्....

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2022 14:56 IST

एक महिला मास्क आणि चष्मा घातलेली व्हिडिओमध्ये दिसत आहे. ती अनेक नेकलेसच्या डिझाईन्सकडे पाहते, नंतर चतुराईने तिच्या साडीखाली एक बॉक्स ठेवते.

उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये दागिन्यांच्या दुकानात ग्राहक म्हणून आलेल्या एका महिलेने काही मिनिटांतच सोन्याचा हार चोरून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  चोरीला गेलेल्या नेकलेसची किंमत 10 लाख रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे. कँट परिसरातील बलदेव प्लाझा येथील बेचू लाल सराफ प्रायव्हेट लिमिटेडच्या शोरूममध्ये 17 नोव्हेंबर रोजी ही घटना घडली. शोरूममध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात महिलेचा चोरी करतानाचा व्हिडिओ कैद झाला आहे. दुकान मालक गौरव सराफ यांनी सांगितले की, काही तासांनंतर नेकलेस चोरीप्रकरणी पोलिसांकडे लेखी तक्रार दिली. 

एक महिला मास्क आणि चष्मा घातलेली व्हिडिओमध्ये दिसत आहे. ती अनेक नेकलेसच्या डिझाईन्सकडे पाहते, नंतर चतुराईने तिच्या साडीखाली एक बॉक्स ठेवते. मग लक्ष विचलित करण्यासाठी ती ज्वेलर्सला आणखी काही हार दाखवायला सांगते. मग ती न आवडण्याचे कारण सांगून काहीही खरेदी न करता निघून जाते. याच दरम्यान सेल्समनला शंका येत नाही. महिलेने चोरलेल्या बॉक्समध्ये सोन्याचा हार आणि कानातले होते, ज्याची किंमत 10 लाख असल्याचे सांगण्यात येत आहे.

बलदेव प्लाझा येथील बेचू लाल सराफच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 नोव्हेंबर रोजी शोरूममध्ये ग्राहकांची मोठी गर्दी होती. दागिन्यांची खरेदी करण्यासाठी अनेक महिला शोरूममध्ये पोहोचल्या होत्या. याच दरम्यान, हिरव्या साडीतली 45 वर्षीय महिलाही आली. महिलेने चेहऱ्यावर मास्क आणि काळा चष्मा लावला होता. तिचे वय आणि तिचा पेहराव बघून ती अशी घटना करेल याची कल्पनाही कुणालाही नव्हती.

कर्मचाऱ्यांनी तिला नेकलेस सेट दाखवायला सुरुवात केली. पण, महिलेच्या समोर दोन बॉक्स ठेवताच तिने लगेच दुसरा बॉक्स एका बॉक्सच्या वर ठेवला आणि नंतर दोन्ही बॉक्स एकत्र उचलून आपल्या मांडीवर ठेवले. काही वेळ पाहिल्यानंतर आता दागिने आवडत नसल्याचे सांगून ती निघून गेली. नंतर दागिन्यांचा सेट कमी असल्याचे आढळल्याने शोरूममध्ये एकच खळबळ उडाली. मालकाला आधी कर्मचाऱ्यांवर संशय येऊ लागला, मात्र जेव्हा शोरूमचे सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. शोरूममध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये महिलेचे हे संपूर्ण कृत्य कैद झाले आहे. सध्या पोलीस महिलेचा शोध घेत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी