शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

जाहिरातीच्या शूटिंगसाठी आलेल्या फ्रेंच पर्यटकावर बलात्कार; आरोपीला पोलिसांनी केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 18:12 IST

फ्रेंच पर्यटक महिलेवर उदयपूरमध्ये बलात्कार

Rajasthan Crime: राजस्थानच्या उदयपूरमध्ये एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या कर्मचाऱ्याने एका फ्रेंच पर्यटक महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला. आरोपी तरुणाने प्रथम एका कॅफेमध्ये पार्टी केली, नंतर महिलेला टूरला घेऊन जाण्याच्या बहाण्याने त्याच्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. पीडितेने रुग्णालयात दाखल होऊन एफआयआर दाखल केला. या घटनेतील आरोपीचं नाव सिद्धार्थ असं असून त्याला अटक करण्यात आली आहे. आरोपीला चित्तोडगढ येथून अटक करण्यात आली आहे. तो एका कास्टिंग कंपनीचा मालक आहे. तो चित्रपट, जाहिराती, गाणी आणि मालिकांसाठी कास्टिंग करतो. तो सलमान खान आणि अक्षय कुमार सारख्या बॉलिवूड स्टार्ससाठी कास्टिंग करतो.

पीडित महिला, इतर दोन मैत्रिणी आणि एका इव्हेंट मॅनेजमेंट फर्मचे काही कर्मचारी रविवारी संध्याकाळी उदयपूरच्या बडगाव परिसरातील टायगर हिल्स येथील रेस्टॉरंटमध्ये गेले होते. पीडित महिला इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीने आयोजित केलेल्या एका जाहिरातीच्या शूटिंगसाठी उदयपूरमध्ये आली होती. पीडिता १७ एप्रिलपासून भारतात असून २२ जून रोजी दिल्लीहून एका बसने उदयपूरला आली होती. त्यानंतर हा सगळा प्रकार घडला.

"पीडित महिलेने सांगितले की ती सिद्धार्थ नावाच्या व्यक्तीच्या कारमध्ये निघून गेली. त्याने तिला त्याच्या खोलीवर नेले व तिच्यावर अत्याचार केला. आम्ही रेस्टॉरंट आणि हॉटेलमधील फुटेज तपासत आहोत", अशी माहिती उदयपूरच्या पोलिस अधीक्षकांनी दिली.

दुसरीकडे, अटकेनंतर आरोपी पुष्पराज उर्फ ​​सिद्धार्थ ओझा (२९) याने मा हनी ट्रॅपमध्ये अडकले गेल्याचे म्हटलं आहे. बॉलिवूडमधील काही लोक मला अडकवत आहेत, असा सिद्धार्थचा आरोप आहे. पुष्पराज हा चित्तोडगडच्या गंगारार तहसील परिसरातील रहिवासी आहे. तो सुमारे ८ वर्षांपासून उदयपूरमध्ये राहत आहे.

आरोपी आणि त्याच्या सहकाऱ्याची कास्टिंग कॉल नावाची कंपनी आहे. या कंपनीने तरुणीला शूटसाठी कामावर ठेवले होते. ती मुलगी २२ जून रोजी उदयपूरला मोबाईल जाहिरातीच्या शूटसाठी आली होती. त्याच दिवशी पिचोला, सज्जनगड किल्ला आणि जवळच्या रेस्टॉरंट्समध्ये शूटिंग करण्यात आले. त्यानंतर, संध्याकाळी टायगर हिल येथील द ग्रीक फार्म आणि रेस्ट्रो कॅफेमध्ये क्रू मेंबर्सनी पार्टी केली. पार्टी दरम्यान, सिद्धार्थने फ्रेंच मुलीला धूम्रपान करण्याच्या बहाण्याने सुखेर येथील त्याच्या फ्लॅटवर नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. चौकशीदरम्यान पुष्पराजने आपला गुन्हा कबूल केल्याचा दावा पोलिसांनी केला. सात दिवसांत तपास पूर्ण केल्यानंतर त्याला न्यायालयात सादर केले जाईल. ही मुलगी बऱ्याच काळापासून दिल्लीत राहत आहे. ती यापूर्वीही राजस्थानमध्ये आली आहे. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानCrime Newsगुन्हेगारी