शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

महिलेला हिप्नॉटाइझ करून एटीएममधून काढून घेतली रोख रक्कम  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2018 11:56 IST

हिप्नॉटाइझ करून एटीएम कार्डवरील रक्कम लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

नवी दिल्ली - आतापर्यंत शस्त्राचा धाक दाखवून, दमदाटी करून लुटालूट केल्याचे प्रकार तुम्ही ऐकले असतील. पण चक्क एका महिलेला हिप्नॉटाइझ करून तिच्याकडील एटीएम कार्डवरील रक्कम लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दक्षिण दिल्लीतील परिसरामध्ये ही घटना घडली आहे. एका एनजीओच्या प्रसारमाध्यम विभागात काम करणाऱ्या  बरखा हजारिका नामक आसामी महिलेने यासंदर्भातील तक्रार दिली आहे. पीडित महिला घरी असताना एक अनोळखी इसम तिच्या घरी आला. त्याने जवळील गुरुद्वारात होणाऱ्या उत्सवासाठी पैसे गोळा करत असल्याचे सांगत या महिलेकडे पैशांची मागणी केली. या महिलेने त्याला  दोनशे रुपयांची नोट देऊन उरलेले पैसे परत करण्यास सांगितले. मात्र त्याने सर्व पैसे स्वत: जवळ ठेवले. त्यानंतर तो घरात घुसला. तसेच आसाममध्ये राहणारी तिची आई काही दिवसांत मरण पावणार आहे, अशी भविष्यवाणी त्याने पीडित महिलेला सांगितली. तसेच हे रोखण्यासाठी विशेष पूजा करावी लागेल, असे सांगून त्याने या महिलेला हिप्नॉटाइझ केले. तसेच तिच्याकडून घरातील रोख रक्कम काढून घेतली. त्यानंतर या महिलेला एटीएममध्ये नेऊन तिच्याकडून काही रक्कम काढून घेतली. मग या महिलेला घरी सोडून हा इसम फरार झाला. दरम्यान, घरी पोहोचल्यावर आपली फसवणूक झाल्याचे पीडित महिलेच्या लक्षात आहे. दरम्यान, या तरुणाने सांगितलेल्या गुरुद्वाराच्या ठिकाणी अधिक चौकशीसाठी ही महिला गेली असता अशा प्रकारच्या काही घटना परिसरात याआधीही घडल्याची माहिती समोर आली.  या महिलेचे एकूण चार हजार रुपये या चोरट्याने लांबवले. दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलिस अधिक तपास करत आहेत. 

टॅग्स :atmएटीएमCrime Newsगुन्हेगारी