शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
2
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
5
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
6
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
7
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
8
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
9
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
10
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
11
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
12
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
13
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
14
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
15
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
16
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
17
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
18
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
19
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
20
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश

खळबळजनक! लाचप्रकरणी पोलीस अधिकाऱ्याविरोधातच एसीबीत गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2019 19:08 IST

पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देगायकवाड हे अटकपूर्व जामीन मिळविण्याच्या प्रयत्नात असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून लवकरच त्यांना अटक होण्याची शक्यता आहे.

मुंबई - जे. जे. मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिरीष गायकवाड यांनी २ लाख लाच मागितली म्हणून एसीबीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

दक्षिण मुंबईतील एका प्रमुख पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाने एकाकडे तब्बल दोन लाखाची मागणी केल्याची धक्कादायक प्रकार आज उघडकीस आला आहे. शिरीष मुरलीधर गायकवाड असे त्यांचे नाव असून जे.जे. मार्ग पोलीस ठाण्याचे प्रभारी आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून लवकरच त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. प्रभारी अधिकाऱ्याच्या लाचखोरीचा प्रकार उघडकीस आल्याने मुंबई पोलीस वर्तुळात गुरुवारी खळबळ उडाल दरम्यान, गायकवाड हे अटकपूर्व जामीन मिळविण्याच्या प्रयत्नात असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.जे.जे.मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत रहात असलेल्या एका तरुणावर पूर्वी काही गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर घातक कृत्याला लगाम घालण्यासाठी (एम.पी.डी.ए.) प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची भीती पोलिसांकडून दाखविण्यात येत होती. कारवाई टाळावयाची असल्यास त्याने दोन लाख रुपये द्यावेत, अशी मागणी वरिष्ठ निरीक्षक गायकवाड यांनी त्याच्या सहकाऱ्यामार्फत पोलीस ठाण्यात बोलावून केली होती. तरुणाला ही रक्कम द्यावयाची नसल्याने त्याने त्याबाबत एससीबीकडे तक्रार दिली. त्याने रचलेल्या सापळ्यानुसार फिर्यादी तरुण हा पुन्हा पोलीस ठाण्यात जावून त्यासंबंधी गायकवाड यांच्याशी चर्चा करुन त्याबाबतचे संभाषण मोबाईलमध्ये रेकार्ड केले. त्यावर पथकाने गायकवाड यांच्याकडे चौकशी केली असता त्याने पैशाची मागणी केल्याची कबुली दिली. त्यानुसार भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम१९८८ कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्या कक्षातील कागदपत्राची तपासणी करण्यात येत असून लवकरच अटकेची कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

पोलिसांवर खंडणी, लाचखोरीचे गुन्हेसदरक्षणाय खलनिग्रहणाय, हे बिरुदावली असलेल्या मुंबई पोलीस दलासाठी गुरुवारचा दिवस लाजिरवाणा ठरला. एका सात वर्षाच्या मुलाला घरगुती वादातून अपहरण करुन दीड कोटीची मागणी केल्याप्रकरणी चेंबूर पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक अमोल चव्हाण याला औरंगाबाद पोलिसांनी सकाळी अटक केली. तर पोलीस ठाण्याचा प्रमुख असलेल्या शिरीष गायकवाड यांनी प्रतिबंधात्मक कारवाई टाळण्यासाठी दोन लाखाची मागणी केल्याचे उघड झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी भ्रष्टाचार व गैरशिस्त खपवून न घेण्याचा इशारा दिला असतानाही पोलिसांची कृष्णकृत्ये सुरुच असल्याचे त्यातून स्पष्ट होत आहे.

 

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागPoliceपोलिस