शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

वालीव पोलीस ठाण्याला लागले ग्रहण; तत्कालीन उपनिरीक्षकासह तिघांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2019 16:19 IST

वालीव पोलीस ठाण्याला ग्रहण लागले असल्याचे बोलले जात आहे.

ठळक मुद्देअमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी सोमवारी मध्यरात्री गुन्हा दाखल झाल्याने पालघर जिल्ह्यातील पोलिसांमध्ये एकच खळबळ माजली आहे. विदेशी सिगारेट चोरी करून विकल्याचा प्रताप उघडकीस आल्यावर 11 सप्टेंबरला गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली होती.

विरार - वालीव पोलीस ठाण्यातील तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक, गुन्हे प्रकटीकरण शाखेचा पोलीस शिपाई आणि एक खाजगी तरुण असा एकूण 3 लोकांवर अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी सोमवारी मध्यरात्री गुन्हा दाखल झाल्याने पालघर जिल्ह्यातील पोलिसांमध्ये एकच खळबळ माजली आहे. वालीव पोलिसांनी गुन्हा दाखल करत खाजगी तरुणाला अटक केले असून दोन्ही फरार आरोपी पोलिसांचा कसून शोध घेत तपास करीत आहे. या आठवड्यात दोन वेळा पोलिसांवर गुन्हे दाखल झाल्याने जणू वालीव पोलीस ठाण्याला ग्रहण लागले असल्याचे बोलले जात आहे.वालीव पोलीस ठाण्यात मुद्देमाल कारकून सहाय्यक फौजदार शरीफ रमजान शेख याने चोरीच्या गुन्ह्यात जप्त केलेल्या मुद्देमालामधील 2 करोड 16 लाख रुपयांच्या विदेशी सिगारेट चोरी करून विकल्याचा प्रताप उघडकीस आल्यावर 11 सप्टेंबरला गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली होती. याच गुन्ह्याचा तपास वसई पोलीस उपअधीक्षक डॉ. आश्विनी पाटील या करत असताना दोन खबऱ्यांना पकडले होते व तिथूनच हा गौप्यस्फोट झाला आहे. एका खबऱ्याने पोलीस तपासात माहिती दिली की, ऑगस्ट महिन्यांमध्ये ड्रग्स माफिया मुंबई अहमदाबाद महामार्गावरील किनारा हॉटेलच्या परिसरात ड्रग्स विकायला येणार असल्याची माहिती वालीव गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलीस उपनिरीक्षक विजय चव्हाण आणि पोलीस शिपाई भीमगोंडा व्हसकोटी यांना दिली होती. या माहितीच्या आधारे सापळा रचून विकायला आलेल्या आरोपीला पकडून त्याच्याकडून हिरोईन नावाचे अमली पदार्थ जप्त करत त्याच्यासोबत आर्थिक व्यवहार करून त्याला सोडून देण्यात आले होते. ही माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांना कल्पना दिल्यावर त्यांनी दिलेल्या आदेशावरून दोन्ही पोलीस आणि खाजगी तरुण निखिल गिरीधर ठाकूर (30) या तिघांविरोधात अमली पदार्थांचा गुन्हा दाखल केला आहे. निखिल याच्या बॅगेची पोलिसांनी झाडाझडती घेतल्यावर 75 हजार रुपयांचे 14 ग्रॅम हिरोईन प्लास्टिक पिशवीमध्ये सापडले असून ते जप्त करण्यात आले आहे. गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस शिपाई व्हसकोटी हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार आहे तर तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक विजय चव्हाण याची बढती होऊन सहायक पोलिस निरीक्षक म्हणून नागपूरला बदली झालेली आहे.

टॅग्स :Drugsअमली पदार्थPoliceपोलिसVirarविरारCrime Newsगुन्हेगारी