शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून पत्नी रागावली! पतीसह नणंदेला धक्काबुक्की करून चाकूने वार करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2022 16:34 IST

Crime News : फिर्यादी हिम्मत रामचंद्र भाईर (३७) यांनी रविवार ९ जानेवारी रोजी दिलेल्या फिर्यादी नुसार त्याची पत्नी पूजा हिच्यावर भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मीरारोड - दीर आपल्याला वाट्टेल तसा बोलतो याची तक्रार पतीकडे केल्यानंतर पती दिराला काही बोलत नसल्याने संतापलेल्या पत्नीने पतीला शिवीगाळ व धक्काबुक्की केलीच शिवाय दिरावर चाकूने वर करत दिव्यांग नणंदला सुद्धा धक्काबुक्की केल्याची घटना भाईंदरमध्ये घडली आहे.फिर्यादी हिम्मत रामचंद्र भाईर (३७) यांनी रविवार ९ जानेवारी रोजी दिलेल्या फिर्यादी नुसार त्याची पत्नी पूजा हिच्यावर भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिम्मत हे भाईंदरच्या मुर्धा गावात राहतात . ते महापालिकेत ठेक्यावर कामाला असून त्यांचा लहान भरून मयूर हा देखील पालिकेत कामाला आहे. हिम्मतसह त्याची पत्नी पूजा, सव्वा वर्षाचा मुलगा विवान, भाऊ मयूर व दिव्यांग बहीण प्रमिला असे एकत्र राहतात. शनिवार ८ जानेवारी रोजी सायंकाळी ७ . ३० च्या सुमारास कामावरून घरी आल्यावर रात्री जेवण आटोपल्या नंतर पत्नी पुजा हिने पती कडे मोठ्या आवाजात ओरडून दीर मयूरची तक्रार सुरु केली. तुझा भाऊ मयुर हा मला, तु घरात जेवण बनवत नाहीस, काही कामे करत नाहीस, सारखी झोपुन असते असे का बोलला ? तुला त्याला समजावता येत नाही का ? त्याला मला बोलण्याचा काय अधिकार ते तुला समजत नाही का ? असे पूजा पतीला मोठमोठ्याने ओरडून सांगू लागली. हिम्मत यांनी पत्नीला शांत राहण्यास सांगितले व पत्नी आणि भावास समजावू लागला . त्याचा राग येऊन पूजा रागारागात स्वयंपाक घरात गेली आणि भाजी कापण्याचा चाकू घेवुन आली . चाकू दाखवत तिने पती व दिरास शिवीगाळी त्यांच्या अंगावर धावून गेली . त्यात मयूरच्या उजव्या हाताच्या चाकू मारल्याने जखम झाली . पती सोडवण्यास गेला असता त्याला सुध्दा धक्काबुकी करुन शिवीगाळ केली.पूजाने मुलगा विवान याला मारण्याचा प्रयत्न केला असता नणंद प्रमिला वाचवायला गेली म्हणून तिला देखील शिवीगाळी करुन मारहाण करण्याची धमकी दिली. हिम्मत व मयूर यांनी भाईंदरच्या भीमसेन रुग्णालयात जाऊन उपचार केले. पतीच्या फिर्यादीनंतर पत्नीवर गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणी भाईंदर पोलीस नेमकी वस्तुस्थिती आणि घटना याचा तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसmira roadमीरा रोड