बीडमध्ये जिल्हा रुग्णालयात नर्सिंगच्या विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2020 05:00 PM2020-06-08T17:00:41+5:302020-06-08T17:01:17+5:30

त्रीसदस्यीय समितीने चौकशी करून अहवाल दिल्यानंतर डॉ.थोरात यांनी त्याची बदली माजलगाव ग्रामीण रुग्णालयात केली आहे.

A case has been registered against an employee of a district hospital in Beed for molesting a nursing student | बीडमध्ये जिल्हा रुग्णालयात नर्सिंगच्या विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

बीडमध्ये जिल्हा रुग्णालयात नर्सिंगच्या विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

Next

बीड : जिल्हा रुग्णालयात शिकाऊ असलेल्या नर्सिंगच्या विद्यार्थिनीची रुग्णालयातीलच एका कर्मचाऱ्याने छेड काढली होती. त्यानंतर नातेवाईकांनी रुग्णालयात जावून त्याला चोप दिला होता. आता याच प्रकरणात पीडितेने पेठबीड पोलीस ठाण्यात शेख मेहमुद शेख महंमद पाशा (वय ४७) याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्याला अटक केल्यानंतर  न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला जामिनही दिला आहे.

सध्या कोरोना महामारीत सर्वच जण जीव ओतून काम करीत आहे. आरोग्य विभागाकडे मनुष्यबळ कमी असल्याने शिकाऊ विद्यार्थ्यांची मदत घेतली जात आहे. बीड जिल्हा रुग्णालयातही शासकीय नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थीनी कर्तव्य बजावतात. ४ जून रोजी सकाळी ११ वाजता पीडित विद्यार्थिनी कार्यालयीन कामकाजासाठी गेली होती. याचवेळी येथील कर्मचारी शेख मेहमुद शेख महंमद पाशा (वय ४७) याने तिची छेड काढली. त्यानंतर या विद्यार्थिनीने जिल्हा  शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांच्याकडे तक्रार केली होती. यात त्रीसदस्यीय समितीने चौकशी करून अहवाल दिल्यानंतर डॉ.थोरात यांनी त्याची बदली माजलगाव ग्रामीण रुग्णालयात केली आहे. तर पुढील कारवाईसाठी अहवाल उपसंचालकांकडे पाठविला आहे. 
दरम्यान, चौकशी पूर्ण होताच पीडितेने पेठ बीड पोलीस ठाणे गाठून शेख विरोधात तक्रार दिली. त्यावरून त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला जामिन मंजूर झाल्याचे तपास अधिकारी सपोनि भारती यांनी सांगितले.

तक्रार द्यायला आला अन् अटक केला
शेख हा मारहाण झाली म्हणून पेठबीड पोलीस ठाण्यात आला होता. तेवढ्यात पीडिताही ठाण्यात आली आणि तक्रार दिली. त्याच क्षणी पोलिसांनी त्याला अटक केली. 

पीडितेच्या पतीविरोधातही गुन्हा
रुग्णालयात येऊन पत्नीची छेड काढणाऱ्या कर्मचाऱ्याला मारहाण झाली होती. त्यानंतर या कर्मचाऱ्याने तिच्या पतीविरोधात शासकीय कामात अडथळा व मारहाण केली म्हणून गुन्हा दाखल केला आहे. त्यालाही अटक केल्याचे पोनि विश्वास पाटील यांनी सांगितले.

Web Title: A case has been registered against an employee of a district hospital in Beed for molesting a nursing student

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.