शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
3
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
4
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
5
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
6
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
7
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
8
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
9
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
10
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
11
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
12
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
13
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
14
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
15
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
16
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
17
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
18
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
19
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
20
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात

भ्रष्टाचारप्रकरणी १३ बँकांच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल; १,४०० कोटींचा घोटाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2023 11:10 IST

पैसे हडपल्याचा ठपका; घोटाळा कसा केला? जाणून घ्या

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मोबाइल टॉवर व अन्य दूरसंचार उद्योगात कार्यरत असलेल्या जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने १३ बँकांच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून १,४०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी सीबीआयने कंपनी व १३ बँकांच्या अधिकाऱ्यांविरोधात मुंबईत गुन्हा दाखल केला आहे. या बँक अधिकाऱ्यांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय, पंजाब नॅशनल बँक, ॲक्सिस बँक आदी बँकांच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तर, याचप्रकरणी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निवासस्थानीदेखील छापेमारी केली.

मनोज तिरोडकर या उद्योजकाने जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीची स्थापना २००४मध्ये केली होती. त्यानंतर, देशामध्ये तब्बल २७ हजार ७२९ मोबाइल टॉवरची उभारणी केली आहे. कंपनीने २००४ ते २०११ या कालावधीमध्ये वेळोवेळी कर्ज घेतले. मात्र, कर्जाची नियमित परतफेड न झाल्यामुळे कंपनीने तब्बल ११ हजार २६३ कोटी रुपयांचे कर्ज थकवले होते. २०११मध्ये कंपनीच्या थकलेल्या कर्जासाठी पुनर्रचनेचा प्रस्ताव पुढे आला होता. मात्र, तो अस्तित्त्वात येऊ शकला नाही. त्यावेळी कंपनीच्या एकूण थकीत कर्जापैकी ७,२०० कोटी रुपयांचे कर्ज या बँकांनी कंपनीच्या समभागांमध्ये रुपांतरित केले, तर ४,०६३ कोटी रुपयांची बाकी कंपनीतर्फे शिल्लक राहिली. 

कंपनीने या थकीत कर्जाच्या रकमेचा विनियोग कसा केला, याची तपासणी केली असता कंपनीने आपल्या ओळखीच्या कंपनीतच व्यवहार झाल्याचे दाखवत ते पैसे स्वतःच्याच समुहातील अन्य तीन कंपन्यांत गुंतविल्याचे आढळून आले. दरम्यान, बँकांची फसवणूक केल्याप्रकरणी यापूर्वी जानेवारीमध्ये तिरोडकर आणि कंपनीविरोधात सीबीआयने आणखी एक गुन्हा दाखल केला होता.

घोटाळा कसा केला?

  • कंपनीचे जे ४,०६३ कोटी रुपयांचे कर्ज थकले होते, ते कर्ज कंपनीने बँकेच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने मे. एडलवाईज ॲसेट  रिकन्स्ट्रक्शन कंपनीला विकले. हे कर्ज केवळ २,३५४ कोटी रुपयांना विकले.
  • तोवर कंपनीच्या पायाभूत सुविधा उपलब्ध होत्या, त्यातही मोठ्या प्रमाणात घसारा (डिप्रीसीएशन) निर्माण झाला होता. 
  • बँकांनीही त्यांना येणे असलेल्या ३,२२४ कोटी रुपयांचे कर्ज याच ॲसेट  रिकन्स्ट्रक्शन कंपनीला अवघ्या १,८६७ कोटी रुपयांना विकले. या व्यवहारामुळे बँकांना मोठा तोटा झाल्याचा ठपका सीबीआयने ठेवला आहे.
  • याखेरीज बँकांनी त्यांच्या कर्जाचे रूपांतर कंपनीच्या समभागांत केले होते. त्याचे प्रमाण ६४ टक्के इतके होते. मात्र, बँकांनी कधीही या समभागांची विक्री केली नाही किंवा कर्जाच्या वसुलीसाठी कोणतीही वसुली प्रक्रिया राबवली नसल्याचा ठपका सीबीआयने ठेवला आहे.

 

टॅग्स :bankबँकCorruptionभ्रष्टाचार