शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदाच्या निडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
2
ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान भारताचा मोठा निर्णय; अमेरिकेकडून 'एफ ३५' जेट खरेदी करणार नाही!
3
"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा
4
सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले; सर्व्हर डाऊनचे मेसेज दिसू लागले...
5
Pune Crime: कोयता काढला अन् सपासप वार करत सुटला; बारामती-इंदापूर धावत्या बसमध्ये प्रवाशावर हल्ला
6
बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; IPBS ची १०,२७७ पदांवर मेगाभरती, महाराष्ट्रासाठी किती जागा?
7
आता PF काढणं झालं एकदम सोपं! फक्त 'हे' काम करा आणि कागदपत्रांशिवाय काही दिवसांत पैसे मिळवा!
8
ऑगस्ट २०२५ पासून बँकिंग आणि पैशांशी निगडीत नियमांत बदल; तुमच्यासाठी जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं
9
पत्नीने पतीला नपुंसक म्हणणं गुन्हा आहे?; मुंबई हायकोर्टानं दिला महत्त्वाचा निर्णय
10
मुंबई आणि मालेगाव बॉम्बस्फोटात दुटप्पी राजकारण; केशव उपाध्ये यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली...
12
"मला कोंडून ठेवलं, पत्नीला दुखापत..."; आमदार चेतन आनंद यांचे एम्स कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप
13
जावई पहिल्यांदा सासरवाडीत आला, सासुने मस्त चिकनचा बेत आखला; विषबाधेमुळे दोघांचाही मृत्यू
14
प्रेमाचा त्रिकोण! आमच्या दोघींपैकी एकीला निवड; गर्लफ्रेंडच्या सांगण्यावरून पतीने केला मोठा कांड
15
२४ घरं, ४ प्लॉट, ४० एकर शेतजमीन... १५ हजार पगार असलेल्या क्लार्ककडे ३० कोटींचं घबाड
16
एकमेकांना शेवटचं बघताच आलं नाही! अल्जेरियात मुलाचा मृत्यू, मृतदेहाची वाट पाहणाऱ्या वडिलांचेही निधन 
17
एन चंद्रशेखरन यांच्या हाती पुन्हा टाटा सन्सची धुरा; IPO ची वाट पाहणाऱ्यांना पुन्हा एकदा मोठा झटका
18
वडिलांचा मृत्यू, बॉयफ्रेंडसोबत पळाली आई; लेकाची पोलिसांत धाव, म्हणाला, "ते मला मारुन टाकतील..."
19
नोकरी सुरू होताच १५,००० रुपये तुमच्या खात्यात! मोदी सरकारने आणली 'ही' खास योजना, कंपनीलाही मिळेल फायदा!

कार उडवली अन् पोलिसांचा युनिफॉर्म फाडला; रेंज रोव्हर गर्लचा हाय व्होल्टेज ड्रामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2022 13:32 IST

Drunken girl range rover car road accident : एक महिला आणि दोन मुले जखमी आहेत. रेंज रोव्हर चालवणारी तरुणी दारूच्या नशेत होती, असा आरोप आहे.

हरियाणातील अंबाला येथे दिल्ली-अमृतसर राष्ट्रीय महामार्गावर हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. एका मुलीने रेंज रोव्हर कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या लाल रंगाच्या कारला धडक दिली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला. एक महिला आणि दोन मुले जखमी आहेत. रेंज रोव्हर चालवणारी तरुणी दारूच्या नशेत होती, असा आरोप आहे. परंतु जेव्हा तिला वैद्यकीय चाचणी घेण्यास सांगितले. तेव्हा तिने वडिलांच्या येण्यापूर्वी कोणतीही चाचणी करण्यास नकार दिला आणि गोंधळ घातला. 

दिल्ली-अमृतसर राष्ट्रीय महामार्गावर एका भरधाव रेंज रोव्हरने एका कारला मागून इतकी जोरदार धडक दिली की, कारचा स्फोट झाला. कारमधील कुटुंब प्रमुख असलेल्या कार चालकाचा जागीच मृत्यू झाला तर इतर तिघे गंभीर जखमी झाले.नशेत होत्या मुली रेंज रोव्हरमधील मुली दारूच्या नशेत होत्या, त्यामुळे तिथे उभ्या असलेल्या लोकांनी मुलींच्या गाडीला घेराव घातला. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर मुलींनी महिला पोलिसांना मारहाण केली आणि त्यांच्या युनिफॉर्मवरील नेम प्लेटही उखडून टाकल्या. सध्या पोलिसांनी मुलींना ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू केली आहे.महामार्गावर प्रचंड गोंधळपोलीस कर्मचारी मनजीत कौर यांनी सांगितले की, अपघातानंतर मद्यधुंद अवस्थेत असलेल्या मुलींनी महामार्गावरच एकच गोंधळ घातला. कसेबसे मुलींना रेंज रोव्हरमधून उतरवून पोलीस जिप्सीत बसवले, मात्र दारूच्या नशेत असलेल्या या मुलींनी वाटेत महिला पोलिसांनाही मारहाण केली.

पोलिसांना फटकारलेआरोपी मुलींनी पोलिसांना चांगलेच धारेवर धरले आणि वकिलासह त्यांचे पालक येईपर्यंत पोलिसांना स्वत:ची कोणतीही माहिती न देण्यावर ठाम राहिल्या. महिला पोलिसांच्या मदतीने या दोन मुलींना अंबाला कॅन्टोन्मेंट येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय उपचारासाठी नेण्यात आले, तेथेही त्यांनी हायव्होल्टेज ड्रामा केला. 

तिचा चेहरा लपवलायानंतर पोलीस ठाण्यात बसूनही त्यांची वागणुकीत फरक पडला नाही. त्यामुळे मीडियाचा कॅमेरा पाहून तिने आधी चेहरा लपवायला सुरुवात केली आणि मग उलट पोलिसांवरच आरोप करायला सुरुवात केली. 

पोलिसांनाही मारहाण केलीअंबाला पोलिसांचे डीएसपी राम कुमार यांनी सांगितले की, मुलींवर वैद्यकीय उपचार केले जात आहेत. दोन्ही मुली दारूच्या नशेत असल्याचे समजत आहे. मुलीच्या कारच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला आहे. दोन्ही मुलींनी पोलिसांवरही हल्ला केल्याचे डीएसपीने मान्य केले. आता पोलिसांनी दोघांवर कारवाई सुरू केली आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूHaryanaहरयाणाPoliceपोलिस