कतारकडे  निघालेल्या व्यापारी जहाजातून गांजा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2020 08:22 PM2020-10-28T20:22:16+5:302020-10-28T20:22:24+5:30

Crime News सबमर्सिबल पंपातून तस्करी; मुंबई एनसीबीची कारवाई

Cannabis seized from a merchant ship bound for Qatar | कतारकडे  निघालेल्या व्यापारी जहाजातून गांजा जप्त

कतारकडे  निघालेल्या व्यापारी जहाजातून गांजा जप्त

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई  - एका व्यापारी जहाजात सबमर्सिबल बोअर पंपात लपवून तस्करी करण्यात येत असलेला ५८० ग्रॅम गांजा  जप्त करण्यात आला आहे. अंमली पदार्थ नियंत्रक विभागाच्या (एनसीबी) मुंबई पथकाने मंगळवारी छापा टाकून ही कारवाई करण्यात आली. 

हिरव्या भाजी असल्याची बतावणी करून तो कर्नाटकातून आणण्यात आला होता.मुंबई मार्गे कतारला पाठविण्यात येणार होता, त्याच्या मालक सापडलेला  नसून त्याचा शोध सुरू असल्याचे   अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.

  एनसीबी मुंबईच्या पथकाने एम / एस डीएचएल एक्स्प्रेस इंडिया (पी) लि., डीएचएल एक्सप्रेस (आय)  या जहाजातून अंमली पदार्थांची तस्करी  करण्यात  येत असल्याची माहिती एनसीबीच्या मुंबई पथकाला समजली. विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी दिलेल्या सूचनेनुसार पथकाने जहाजाची झडती घेतली असता त्यामध्ये एका सबमर्सिबल वॉटर पंपमध्ये हिरव्या भाजीमध्ये गांजा लपवून ठेवला होता. तपासणी केल्यास तो आर्यनचा भाग असल्याचे भासावे, त्याच्या भोवती अ‍ॅल्युमिनियम फॉइल व त्यावर तांब्याची तार गुंडाळली होती.  या वस्तूवर कोणीही आपला दावा न केल्याने तो कोणी जहाजात आणून ठेवला होता, याची माहिती घेण्यात येत आहे.

Web Title: Cannabis seized from a merchant ship bound for Qatar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.