शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सावंतवाडीत गांजा विक्रीचे रॅकेट, मुख्य सुत्रधार बॉबी ताब्यात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2021 20:14 IST

Crime News : सिंधुदुर्ग जिल्हयात गांजा विक्रीचे रॅकेट कार्यरत असल्याचा संशय अनेक दिवसापासून होता.

सावंतवाडी : सावंतवाडीत गांजा विक्रीचे रॅकेट कार्यरत असून, गेल्या दोन दिवसात स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या मदतीने कुडाळ पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले होते. मात्र यातील मुख्य सुत्रधार बॉबी उर्फ फैजल बेग हा फरार होता.तो रविवारी तपास अधिकाऱ्यांसमोर हजर झाल्याने गांजा प्रकरणातील चौथी अटक करण्यात झाली असून, या संशयिताकडून अनेक ग्राहकांची तसेच एंजटाची नावे समोर येण्याची शक्यता आहे. पोलीस त्या पद्धतीने शोध घेत आहेत.

सिंधुदुर्ग जिल्हयात गांजा विक्रीचे रॅकेट कार्यरत असल्याचा संशय अनेक दिवसापासून होता. त्या दृष्टीने पोलीस शोध घेत होते.त्यातच स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने आकेरी जवळ सावंतवाडीतील दोघां युवकांना ताब्यात घेतले यात मयुरेश कांडरकर व आशिष कुलकर्णी यांचा समावेश होता. या दोन्ही आरोपीना स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने कुडाळ पोलिसांच्या ताब्यात दिले.

त्यानंतर कुडाळ पोलिसांनी यामध्ये सखोल तपास करून अतुल उमेश गवस या युवकांला ताब्यात घेतले त्याचा जबाबात सावंतवाडी येथील आणखी एका युवकांचे नाव समोर आले आणि तो यातील मुख्य सुत्रधार असल्याचे पोलिसांना समजले म्हणून पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशिरा सावंतवाडी येथील एका बंद घरात धाड टाकली हे घर बॉबी उर्फ फैजल बेग यांचे असल्याचे चौकशीत पुढे आले. त्याच्या घरात तब्बल ३ किलो गांजा आढळून आला होता. मात्र पोलिसांची धाड पडण्यापूर्वीच तो फरार झाला होता.पोलीस त्यांचा शोध घेत होते.

त्यातच रविवारी सांयकाळी बॉबी हा स्वत:हून कुडाळ पोलीस ठाण्यात तपास अधिकारी सागर भोसले यांच्या समोर हजर झाला असून, पोलीस या प्रकरणी सखोल चौकशी करीत आहेत. त्याचा अद्याप मोबाईल हस्तगत करण्यात आला नव्हता. कारण तो गांजा आणत होता. कुणाला देत होता तसेच यात कोण कोण दलाली करीत होते. त्यानंतर ग्राहक कोण होते या सर्वांचा शोध पोलीस घेणार असून पोलिसांनी या गुन्ह्यात चांगलाच फास आवळतच आरोपी स्वताहून हजर झाल्याने पोलिसांनी ही सुटकेचा निश्वास सोडला आहे. तसेच मुख्य सुत्रधारच ताब्यात आल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

सावंतवाडीतील एंजट तसेच ग्राहक भूमिगतसावंतवाडीत मोठ्या प्रमाणात गांजा येतो तसेच येथे ग्राहक ही मोठ्या प्रमाणात असल्याने आता आपली नावे या गुन्हयात येतील या भितीने यातील एंजट चांगलेच धास्तावले असून,ग्राहक ही घाबरले आहेत. आपली नावे यात आली तर करिअर धोक्यात येतील या भितीने अनेक जण भुमिगत झाले आहेत. मात्र या गुन्ह्याचा सखोल तपास करणार असल्याचे तपास अधिकारी सागर भोसले यांनी सांगितले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsindhudurgसिंधुदुर्ग