शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

मध्यप्रदेशच्या बॉर्डरवर गांजाची शेती, पोलिसांनी ग्राहक बनून आरोपींना केले गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2022 17:47 IST

Drugs Case : महाविद्यालयीन विद्यार्थी, रिक्षाचालकांना विक्री, दोघांसह सप्लायरला अटक; मानपाडा पोलिसांची कारवाई

डोंबिवली: महाराष्ट्र-मध्यप्रदेशच्या बॉर्डरवर असलेल्या धुळयातील शिरपूर तालुक्यात गांजाची शेती फुलविणा-या दोघांसह डोंबिवलीतील सप्लायरला मानपाडा पोलिसांनीअटक करून त्याच्याकडील 3 लाख 10 हजार 500 रूपये किमतीचा गांजा व रोख रककम आणि मोबाईल फोन जप्त केला आहे. शिरपूर तालुक्यात वन विभागाच्या जागेत ही गांजाची शेती आदीवासी लोकांकडून छुप्या पध्दतीने फुलविली जात असल्याचे तपासात उघड झाले आहे. अटक आरोपींना कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने 31 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

मानपाडा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरिक्षक सुनिल तारमळे यांना शिवम हॉटेलच्या परिसरात एकजण गांजाचा माल घेऊन येणार असल्याची माहीती  गुप्त बातमीदारामार्फत मिळाली. त्यानुसार तारमळे यांच्यासह पोलिस नाईक प्रशांत वानखेडे, अशोक कोकोडे, सुशांत तांबे, पोलिस शिपाई संतोष वायकर, ताराचंद सोनवणे आदिंच्या पथकाने सापळा लावला. दोन गोण्यांजवळ एकजण उभा असल्याचे निदर्शनास पडताच त्याला ताब्यात घेऊन गोण्यांची तपासणी केली. यात 20 किलो 300 ग्रॅम वजनाचा गांजा आढळुन आला. याप्रकरणी आनंद शंकर देवकर या 32 वर्षीय व्यक्तीला अटक केली. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गांजाचा माल धुळे जिल्हयातील शिरपूर तालुक्यातून डोंबिवलीत आणल्याची माहीती दिली. याठिकाणी तो महाविद्यालयीन विद्यार्थी आणि रिक्षाचालकांना विक्री करायचा. येथील शिवमंदिर, टाटा पावर परिसरात राहणा-या  आनंदची पार्श्वभूमी गुन्हेगारी असून त्याच्या विरोधात रामनगर पोलिस ठाण्यात मारामारी, विनयभंग, चोरी, हत्यार बाळगणे आदि गुन्हे दाखल आहेत.ग्राहक बनून दोघांना केली अटकआनंदने दिलेल्या माहीतीनुसार पथक धुळयाला रवाना झाले. त्याठिकाणी ग्राहक बनून पोलिसांनी रेहमल पावरा आणि संदीप पावरा या दोघांना अटक केली. यातील तिसरा आरोपी दिनेश पावरा हा फरार असल्याची माहीती वरीष्ठ पोलिस निरिक्षक शेखर बागडे यांनी दिली. ताब्यात घेतलेल्या गांजाची शेती आदीवासी लोकांकडून शिरपूर तालुक्यातील वन विभागाच्या जागेत छुप्या पध्दतीने केली जात आहे. तो गांजा चोरटया मार्गाने शहरी भागात विक्री करण्यासाठी आणला जायचा. महाविद्यालयीन विद्यार्थी आणि रिक्षाचालक गांजा खरेदी करायचे. गांजा खरेदी करणा-यांवर देखील कारवाई केली जाणार आहे याकडे बागडे यांनी लक्ष वेधले.

टॅग्स :Drugsअमली पदार्थMadhya Pradeshमध्य प्रदेशdombivaliडोंबिवलीPoliceपोलिसArrestअटक