शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

कॅब ड्रायव्हर भावोजीला अर्पिता मुखर्जीने पार्टनर म्हणून सांगितले, तीन कंपन्यांमध्ये डायरेक्टर केले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 21:54 IST

Arpita Mukharjee :पण खऱ्या आयुष्यात तो कॅब ड्रायव्हर आहे. इतकंच नाही तर नात्यात तो अर्पिताचा भावोजी असल्याचं समजतं.

शिक्षक भरती घोटाळ्यात अटक करण्यात आलेल्या अर्पिता मुखर्जीने तिच्याशी संबंधित कंपन्यांच्या माध्यमातून फसवणूक कशी केली याचा मोठा पुरावा आज तकला मिळाला आहे. अर्पिता मुखर्जीचा असाच एक व्यावसायिक भागीदार सापडला आहे, जो अर्पितासोबत तीन फर्ममध्ये संचालक होता. पण खऱ्या आयुष्यात तो कॅब ड्रायव्हर आहे. इतकंच नाही तर नात्यात तो अर्पिताचा भावोजी असल्याचं समजतं.कल्याण धर असे या व्यक्तीचे नाव आहे. अर्पितासोबत कल्याण तीन कंपन्यांमध्ये संचालक होता. कागदावर करोडोंचा व्यवसाय करणाऱ्या या कंपन्या होत्या. शिक्षक भरती घोटाळ्यात अर्पिता मुखर्जीला अटक झाल्यानंतर या कंपन्यांची नावे समोर आली होती. याचे कल्याण सहसंचालक होते. आज तकने अर्पिताच्या या संशयित सहसंचालकाची माहिती गोळा केली आहे. तो कागदावर करोडपती आहे, पण प्रत्यक्षात तो एक कॅब ड्रायव्हर आहे. ज्याच्याकडे मोटारसायकलही नाही.अर्पिता आणि कल्याण या तीन फर्ममध्ये संचालक आहेत. यातील पहिले सिम्बायोसिस म्हणजे मर्चंट्स प्रायव्हेट लिमिटेड. अर्पिता 21 मार्च 2011 रोजी त्याची संचालक बनली. कागदपत्रांनुसार, ही कंपनी विविध प्रकारच्या वस्तूंचा घाऊक व्यापार करते. कल्याण धर याला 1 जुलै 2021 रोजी या कंपनीत सहसंचालक बनवण्यात आले.सेन्ट्री इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड असे दुसऱ्या फर्मचे नाव आहे. अर्पिता 9 नोव्हेंबर 2011 रोजी त्याची संचालक झाली. त्यानंतर 2018 मध्ये कल्याणला त्याचे संचालक केले गेले. आतापर्यंत हे दोघेही कंपनीत संचालक आहेत. कागदपत्रांनुसार ही कंपनी खास प्रकारची मशिनरी बनवते.तिसरी फर्म इच्छा एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड आहे. अर्पिता 29 ऑक्टोबर 2014 रोजी त्याची संचालक बनली. कल्याण धर हे या कंपनीचे दुसरे संचालक आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटकEducationशिक्षण