शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सीएला बारबालेने दीड कोटींना लुबाडले, आत्महत्येला कलाटणी, मुलाची तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 02:19 IST

Thane Crime News : वारंवार पैशांची मागणी करणाऱ्या बारबालेवर खुनीहल्ला करून शोभराज राघनी (५४) या लेखापालाने (सीए) हॉटेलच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली होती. मात्र...

ठाणे  - वारंवार पैशांची मागणी करणाऱ्या बारबालेवर खुनीहल्ला करून शोभराज राघनी (५४) या लेखापालाने (सीए) हॉटेलच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली होती. मात्र, या बारबालेसह तिच्या अन्य दोन बहिणींनी ब्लॅकमेल करून गेल्या काही दिवसांमध्ये दीड कोटींची रक्कम उकळल्यामुळेच आपल्या वडिलांनी आत्महत्या केल्याची तक्रार शोभराज यांचा मुलगा साहिल (२३) याने कापूरबावडी पोलीस ठाण्यात रविवारी रात्री केली. या प्रकरणाला कलाटणी मिळाल्याने पोलीसही चक्रावले आहेत.कल्याणच्या खडकपाडा, वायलेनगर येथे राहणाऱ्या साहिल शोबराज याने २८ मार्च, २०२१ रोजी कापूरबावडी पोलीस ठाण्यात या संदर्भात भारतीय दंड विधानाच्या कलम ३०६ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. आपल्या तक्रारीमध्ये त्याने म्हटले आहे की, ठाण्यातील सावरकरनगर येथील पाटीलवाडी भागात राहणारी मुमताज उर्फ नलिनी शर्मा, तसेच तिच्या अन्य दोन बहिणी पिया आणि कमल (तिघींच्याही नावात बदल केला आहे) यांनी २०१६ ते २३ मार्च, २०२१ या कालावधीमध्ये शोभराज यांना वारंवार ब्लॅकमेल करून त्यांना मानसिक त्रास दिला. या काळात त्यांच्याकडून तब्बल दीड कोटींची रक्कम लुबाडली आहे. या तिघींकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून शोभराज यांनी हॉटेलच्या चौथ्या मजल्यावरील खिडकीतून उडी घेऊन आत्महत्या केली.  काय होता प्रकार वारंवार पैशांची मागणी करणाऱ्या बारबालेवर चाकूने खुनीहल्ला करून शोभराज यांनी स्वत:ही बाळकूम येथील रेसिडेन्सी हॉटेलच्या खिडकीतून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना २३ मार्च रोजी घडली होती. या प्रकरणी शोभराज यांच्याविरुद्ध कापूरबावडी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. (CA was robbed of Rs 1.5 crore by Barbala in thane) शोभराज यांचे या ३३ वर्षीय बारबालेशी अनैतिक संबंध होते. गेल्या काही दिवसांपासून ती पैशांची मागणी करीत होती. यातूनच झालेल्या वादातून त्याने रेसिडेन्सी हॉटेलमधील एका खोलीत तिच्यावर चाकूने वार केले. त्यानंतर, स्वत: खिडकीतून उडी घेऊन आत्महत्या केली होती. दरम्यान, खुनाचा प्रयत्न आणि आत्महत्या या दोन्ही प्रकरणांमध्ये आरोपीचा मृत्यू झाल्यामुळे न्यायालयात अबेटेड समरी सादर केली जाणार आहे. मात्र, आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या प्रकरणात बारबालेसह तिघींना गरज पडल्यास अटक केली जाईल, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांनी सांगितले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीthaneठाणे