उल्हासनगरात भाड्याने घेतलेल्या गाड्या टाकल्या विकून, १९ लाख ५४ हजाराची फसवणूक
By सदानंद नाईक | Updated: December 4, 2022 16:06 IST2022-12-04T16:06:34+5:302022-12-04T16:06:58+5:30
धीरज रामरख्यानी यांच्याकडून भाड्याने घेतलेल्या गाड्याचा परस्पर अपहार करून १९ लाख ५४ हजाराची फसवणूक केल्याचा प्रकार २२ ऑक्टोबर ते ३ डिसेंम्बर २०२२ दरम्यान घडला आहे.

उल्हासनगरात भाड्याने घेतलेल्या गाड्या टाकल्या विकून, १९ लाख ५४ हजाराची फसवणूक
उल्हासनगर :
धीरज रामरख्यानी यांच्याकडून भाड्याने घेतलेल्या गाड्याचा परस्पर अपहार करून १९ लाख ५४ हजाराची फसवणूक केल्याचा प्रकार २२ ऑक्टोबर ते ३ डिसेंम्बर २०२२ दरम्यान घडला आहे. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात करण श्यामदासानी याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-३ शिवाजी चौक परिसरात धीरज रामरख्यानी कुटुंबासह राहतात. रामरख्यानी यांचा करण सुनीलकुमार श्यामदासानी यांच्याशी ओळख होऊन करण याने विश्वास संपादन केला. १२ ऑक्टोबर ते ३ डिसेंम्बर २०२२ दरम्यान करण श्यामदासानी याने धीरज यांच्याकडून इर्टीगाच्या दोन गाड्या व वैगनर अश्या तीन गाड्या भाडेतत्त्वावर घेतल्या. मात्र भाड्याने घेतलेल्या गाड्याच्या परस्पर अपहार करून फसवणूक केल्याचे धीरज यांच्या लक्षात आले. त्यांनी मध्यवर्ती पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.
मध्यवर्ती पोलिसांनी करण सुनीलकुमार श्यामदासानी यांच्यावर ३ गाड्याचा अपहार करून १९ लाख ५४ हजाराची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला. करण श्यामदासानी यांनी यापूर्वीं कोणाची फसवणूक केली का? याबाबत पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.