शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवून, व्यावसायिकाला लाखोंना लुटले, मॉडेल आणि तिच्या मित्रावर खंडणीचा गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2021 07:16 IST

२७ मार्च २०२१ रोजी व्यावसायिक अफजल व त्याचा मित्र खालीद याच्याविराेधात आंबोली पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला.

भिवंडी : शहरातील कापड व्यावसायिकाला मुंबईतील एका माॅडेलने बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवून लाखाें रुपये उकळल्याची घटना उघड झाली आहे. याप्रकरणी या माॅडेलवर आणि तिच्या मित्रावर भाेईवाडा पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.अफजल इजहार शेख (वय ३७) असे व्यावसायिकाचे नाव असून, त्यांचा कपड्यांच्या कटिंग स्क्रॅबचा व्यवसाय आहे. अफजल याचा मित्र इसा अनीस अन्सारी (रा. गैबीनगर) याने अफजल याची ओळख त्याची मॉडेलिंग क्षेत्रात काम करणाऱ्या मुंबईतील एका मैत्रिणीशी करून दिली होती. त्यानंतर तिने फोनवरून पैशांची अडचण असल्याचे अफजलला सांगितले. अफजलने इसा याच्याशी चर्चा करून तिला टप्प्याटप्प्याने पाच लाख रुपये दिले. त्यानंतर दाेघांमध्ये घट्ट मैत्री हाेऊन त्यांच्यात शरीरसंबंध झाले. यानंतर मॉडेलिंग क्षेत्रात वेब सिरीजमध्ये २५ लाखांची गुंतवणूक करून महिना पाच लाख रुपये कमावण्याचे प्रलाेभन तिने दिले. मात्र, अफजलने मित्राचा सल्ला घेऊन नकार दिला.त्यानंतर या तरुणीने अफजल याच्याची वारंवार फोन व व्हाॅट्सॲपद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, अफजलने तिला प्रतिसाद दिला नाही. यानंतर या तरुणीने सप्टेंबर, ऑक्टाेबर २०२० मध्ये फाेन करून बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. अखेर २८ जानेवारी २०२१ मध्ये मुंबईतील आंबोली पोलीस ठाण्यात अफजल व त्याचा मित्र खालीद शेख यांच्याविराेधात बलात्काराची तक्रार दाखल केली. त्यानंतर तक्रार मागे घेण्यासाठी २० लाखांची मागणी केली. त्यानंतर अफजलने तीन लाख रुपये मित्राकरवी या तरुणीकडे पाठवले. उर्वरित रक्कम तक्रार मागे घेतल्यानंतर देतो, असे सांगितले. मात्र, तिने २० लाख दिल्यानंतरच तक्रार मागे घेईन, अशी भूमिका घेतली.

दाेघांना अटक  २७ मार्च २०२१ रोजी व्यावसायिक अफजल व त्याचा मित्र खालीद याच्याविराेधात आंबोली पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. अखेर पैसे उकळल्या प्रकरणी अफजल याने तरुणी आणि तिचा मित्र इसा यांच्याविराेधात भोईवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.या दाेघांना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार करत आहेत. 

टॅग्स :RobberyचोरीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी