शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सुसाईड नोट लिहीत चौथ्या मजल्यावरून उडी घेत व्यावसायिकाची आत्महत्या, कर्ज फेडता न आल्याने उचलले पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 09:34 IST

Crime News: कर्ज परत देण्यात अपयश आल्याच्या निराशेत सौरभ पितळे (३०) या व्यावसायिकाने बारा पानी सुसाईड नोट लिहीत आत्महत्या केली. सोमवारी सकाळी आठच्या सुमारास त्यांनी चार मजली इमारतीच्या गच्चीवरून उडी मारली.

 मुंबई : कर्ज परत देण्यात अपयश आल्याच्या निराशेत सौरभ पितळे (३०) या व्यावसायिकाने बारा पानी सुसाईड नोट लिहीत आत्महत्या केली. सोमवारी सकाळी आठच्या सुमारास त्यांनी चार मजली इमारतीच्या गच्चीवरून उडी मारली. याप्रकरणी बांगुरनगर पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.पितळे हे पत्नी आणि मुलासह मालाड पश्चिम परिसरात राहत होते. त्यांचे बांगुरनगरमधील विजय इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये इंजिनीअरिंग वर्कशॉप आहे. लॉकडाऊन दरम्यान फारसे काम नव्हते. त्यामुळे कामासाठी घेतलेल्या २५ लाखांचा डोंगर डोक्यावर होता. त्यामुळेच ते तणावात होते. वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी काही कामानिमित्त बाहेर जाऊन आले आणि त्यानंतर  साडेसात ते आठच्या सुमारास त्यांनी त्याच गच्चीवरून उडी मारली. तो आवाज ऐकून सुरक्षारक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पितळे त्यांना दिसले. याबाबत समजताच बांगुरनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पितळे यांना रुग्णालयात दाखल केले मात्र त्यांचा मृत्यू झाला.  

‘नोट’मध्ये देणेकऱ्यांची नावे : पितळे यांनी कार्यालयात एक सुसाईड नोट लिहून ठेवत त्यामध्ये देणेकऱ्यांची नावे लिहली आहेत. त्यानुसार त्यांना जवळपास २५ लाखांचे कर्ज होते. त्यातून त्यांनी हे पाऊल उचलल्याचे उघड झाले. त्यांच्या भावाचा जबाब पोलिसांनी घेतला असून याबाबत त्यांची कोणाविरोधातही तक्रार नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद तावडे यांनीदेखील या घटनेच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबई