महाराष्ट्रातील पालघरमध्येपोलिसांनी सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून महिलांशी शारीरिक संबंध ठेवणाऱ्या व्यक्तीला अटक केली आणि नंतर हा नराधम व्हिडिओ बनवून पॉर्न साईटवर विकत असे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार आरोपी ठाणे महानगरपालिका परिवहन (टीएमटी) मधील बस कंडक्टर आहे. त्याच्याविरोधात आयपीसी आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यातील तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारी नोकरीचे गाजर दाखवून अनेक महिलांवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली पालघर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने एका बस कंडक्टरला अटक केली आहे. तो ठाणे महापालिकेत बस वाहक (कंडक्टर) म्हणून काम करतो. आरोपी, महिलांवरील बलात्काराचे मोबाइल फोनवर व्हिडीओ रेकॉर्डींग करायचा. त्यानंतर पैशांसाठी ते व्हिडीओ पॉर्न साईटवर अपलोड करत असे आणि त्यातून त्याने पैसे कमावले. आरोपी पालघर जिल्ह्यातील विक्रमगड येथे राहतो. आरोपीकडे मास्टर्स विषयातील पदवी असून, तो डिसेंबर महिन्यापासून अशा प्रकारचे गुन्हे करत आहे असे पुढे पोलिसांनी सांगितले.आरोपीने आतापर्यंत वेगवेगळया महिलांसोबतच्या त्याच्या ६५ क्लिप्स परदेशी पॉर्न वेबसाईटसवर अपलोड केल्या आहेत. त्यातून तो लाखो रुपये कमवायचा असे पोलिसांनी सांगितले. आतापर्यंत दोन पीडित महिला समोर आल्या असून आरोपीविरोधात बलात्काराचे दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत. लॉकडाऊनच्या काळात पैसे कमावण्यासाठी त्याने अशाच पद्धतीने अन्य महिलांचे सुद्धा लैंगिक शोषण केले, असे पोलिसांनी सांगितले.एका पीडित महिलेच्या नातेवाईकाने पॉर्न साईटवर तिचा आरोपीसोबत व्हिडीओ पाहिल्यानंतर त्या व्यक्तीने पीडित महिलेच्या कुटुंबाला याची कल्पना दिली. त्यानंतर हा धक्कादायक समोर उघडकीस आला. कुटुंबियांनी जाब विचारल्यानंतर पीडित महिलेने तिच्याबरोबर काय घडलं? ते सर्व सांगितलं. आरोपीने तिच्याबरोबर मैत्री केली व महापालिकेत नोकरी लावतो असे आश्वासन दिले. काही दिवसांनी आरोपी तिला एका ठिकाणी घेऊन गेला. तिच्यावर बलात्कार केला व त्याचे व्हिडीओ चित्रीकरण केले. याबद्दल कोणाला सांगितले, तर गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी आरोपीने धमकी दिल्याचे मुलीने कुटुंबीयांना सांगितले. त्यानंतर कुटुंबीयांच्या मदतीने पीडिती मुलीने आरोपीविरोधात विक्रमगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दरम्यान दुसऱ्या एका पीडित महिलेने देखील वाळीव पोलीस ठाण्यात त्याच आरोपी विरोधात तक्रार नोंदवली. आरोपीविरोधात बलात्काराच्या दोन वेगवेगळे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. आपल्याविरोधात गुन्हा दाखल असल्याचं समजल्यानंतर घरातून पळ काढला. आरोपी पत्नीला भेटायला येणार असल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी त्याला तिथून ताब्यात घेतले.
पॉर्न साईटवर अश्लील व्हिडीओ टाकून बस कंडक्टरने कमावले पैसे, नोकरीच्या आमिषाने तरुणींशी लगट
By पूनम अपराज | Updated: October 31, 2020 18:34 IST
Rape : त्याच्याविरोधात आयपीसी आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यातील तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पॉर्न साईटवर अश्लील व्हिडीओ टाकून बस कंडक्टरने कमावले पैसे, नोकरीच्या आमिषाने तरुणींशी लगट
ठळक मुद्देपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारी नोकरीचे गाजर दाखवून अनेक महिलांवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली पालघर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने एका बस कंडक्टरला अटक केली आहे.