लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आपल्या कमी उंचीमुळे जगात प्रसिद्धीस आलेल्या ज्योती आमगे हिचे अज्ञात चोरट्यांनी घर फोडून ५० हजारांचा ऐवज लंपास केला. सोमवारी मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. गेल्या दोन महिन्यांपासून ज्योती अमेरिकेत होती. ती विमानाने नागपूर येथे आल्याने नातेवाईक नागपूर विमानतळावर गेले होते, त्याच वेळेत चोरट्यांनी हा डाव साधला.जुना बगडगंज, दत्तनगर अन्नपूर्णा मंदिराच्या मागे ज्योतीचे घर आहे. ज्योती आई-वडिलांसोबत अमेरिकेत होती. सोमवारी मध्यरात्री तिचे विमान नागपूर विमानतळावर आगमन झाले. त्यामुळे तिचा भाऊ आणि घरचे इतर सदस्य त्यांना घेण्यासाठी २ वाजता विमानतळावर गेले होते. हीच संधी साधून चोरट्यांनी घराच्या मुख्य गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील लॉकर तोडून १५ हजार रुपयांच्या रोखेसह ३५ हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. चोरटे घरातच असताना आमगे कुटुंब ३.३० वाजताच्या सुमारास घरी पोहचले. वाहनाचा आवाज आल्याने चोरट्यांनी पळ काढला. यासंदर्भात नंदनवन पोलिसांना सूचना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून चौकशी केली. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता हे चोरटे त्यात कैद झाल्याची माहिती आहे. यासंदर्भात पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध घरफोडीचा गुन्हा नोंदविला आहे.
जगातील सर्वात कमी उंचीच्या ज्योती आमगेकडे घरफोडी : चोरटे सीसीटीव्हीत कैद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 22:59 IST
आपल्या कमीउंचीमुळे जगात प्रसिद्धीस आलेल्या ज्योती आमगे हिचे अज्ञात चोरट्यांनी घर फोडून ५० हजारांचा ऐवज लंपास केला. सोमवारी मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
जगातील सर्वात कमी उंचीच्या ज्योती आमगेकडे घरफोडी : चोरटे सीसीटीव्हीत कैद
ठळक मुद्दे५० हजारांचा ऐवज लंपास