शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

घरफोडी, चोरी करणाऱ्या ४ आरोपींना २४ तासांच्या आत अटक, पेल्हारच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2024 17:53 IST

मंगेश कराळे नालासोपारा  :- घरफोडी, चोरी करणाऱ्या ४ आरोपींना २४ तासाच्या आत पेल्हारच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या पोलिसांनी अटक केल्याची ...

मंगेश कराळे

नालासोपारा  :- घरफोडी, चोरी करणाऱ्या ४ आरोपींना २४ तासाच्या आत पेल्हारच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या पोलिसांनी अटक केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी सोमवारी दिली आहे.

वसई फाट्याच्या ए के इंडस्ट्रीयल इस्टेटमधील परमार टेक्नो सेंटरमध्ये १ जानेवारीला रात्री घरफोडी झाली होती. चोरट्याने बंद गाळ्याच्या शटरची कडी तोडून त्यावाटे प्रवेश केला होता. तेथून चोरट्याने कटिंग व्हील, ग्राईडिंग व्हील, फ्लेप डिस्क, वेल्डिंग रोड, ऑइल पेंट कलर असा एकूण २ लाख ६८ हजार ८०० रुपये किंमतीचा मुद्देमाला चोरी करून नेला होता. मिराज खान (३३) यांनी ३ फेब्रुवारीला तक्रार देऊन गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेऊन पेल्हारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी तात्काळ गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी, अंमलदार यांना गुन्हा उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने योग्य त्या सुचना दिल्या. 

गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक तुकाराम भोपळे यांनी टीमसह गुन्हयाचे घटनास्थळाला भेट देऊन घटनास्थळावरील व आजुबाजुच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले. त्याव्दारे आरोपी बाबत माहिती घेतली. आरोपी हे घरफोडी चोरी करुन भिवंडीला गेल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली. आरोपींचा तांत्रिक बाबींच्या आधारे शोध घेऊन मेराज अली अन्सारी (३२), अब्दुल रेहमान शेख (३०),  रामचंद्र किसन भंडारवार (३०) आणि मोहमद खलील अन्सारी (३६) यांना गुन्हयाचे तपासकामी ताब्यात घेऊन अटक केले. त्यांच्याकडे तपास केल्यावर त्यांनीच गुन्हा केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. आरोपीकडून गुन्हयातील गेलेला १००% माल हस्तगत केला. आरोपीनी गुन्हा करण्याकरीता वापरलेला आयशर टेम्पो असा एकुण १२ लाख ६८ हजार ८०० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.  सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलीस आयुक्त रामचंद्र देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पेल्हारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शिवानंद देवकर, पोलीस निरीक्षक (प्रशासन)  कुमारगौरव धादवड, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक तुकाराम भोपळे, पोलीस हवालदार तानाजी चव्हाण, रवि वानखेडे, निखील मंडलिक, किरण आव्हाड, राहुल कर्पे, दिलदार शेख, अनिल साबळे, सुजय पाटील, नामदेव ढोणे, संतोष खेमनर यांनी पार पाडली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी