शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
2
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
3
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
4
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
5
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
6
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
7
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
8
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
9
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
10
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
11
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
12
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!
13
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
14
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
15
स्वामी विवेकानंदांनी सांगितलेली 'ही' तीन ध्येय साध्य केली तर आपला पराभव होऊच शकणार नाही!
16
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
17
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
18
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
19
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले

सफाई कामगारच करायचा घरफोड्या,साडेचौदा लाखांचे दागिने जप्त, काशिमीरा पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 07:07 IST

crime news : सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. रवी आबा कांबळे (२९) असे आरोपीचे नाव आहे. तो सफाई कामगार आहे. ज्या वसाहतीत काम करायचा तेथेच त्याने २ घरफोड्या केल्या आहेत. 

मीरा रोड : काशिमीरा पोलिसांनी घरफोड्या करणाऱ्यास अटक केली आहे. त्याने परिसरात ४ घरफोडीचे गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी त्याच्या कडून १४ लाख ६७ हजार किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. रवी आबा कांबळे (२९) असे आरोपीचे नाव आहे. तो सफाई कामगार आहे. ज्या वसाहतीत काम करायचा तेथेच त्याने २ घरफोड्या केल्या आहेत. याप्रकरणी सहायक आयुक्त विलास सानप व वरिष्ठ निरीक्षक संजय हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे निरीक्षक विजय पवार, सहायक निरीक्षक प्रशांत गांगुर्डे सह गणेश कोळी, विश्वनाथ जरग, नीलेश शिंदे, स्वप्नील मोहीले, सतीश निकम, जयकुमार राठोड यांच्या पथकाने घरफोड्यांचा तपास सुरू केला. घटनास्थळावरुन प्राप्त माहिती व चौकशीच्या आधारे पोलिसांनी संशयित घरफोड्या हा जनता नगर झोपडपट्टीतील जय अंबे चाळीत राहत असल्याचे समजले.  पोलिसांनी रवी कांबळेला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने माझगावकर यांच्या घरी तसेच जे. पी. नॉर्थ वसाहतीत ३ घरफोड्या केल्याचे उघडकीस आले.  त्याच्या पँटच्या खिशामध्ये २ सोन्याच्या बांगड्या व १ सोन्याचे मंगळसूत्र सापडले. कांबळे हा जे. पी. नॉर्थ वसाहतीत सफाई कामगार म्हणून काम करायचा. त्यामुळे घरात शिरण्यासाठी जागा हेरून पाळत ठेऊन घरफोड्या करायचा. त्याच्याकडून २९३.५ ग्रॅम वजनाचे १४ लाख ६७ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत.

भर दिवसा झालेल्या चोरीने उडाली खळबळकाशीमीरा पोलीस ठाणे हद्दीत मीरारोडच्या विनय नगर भागात राहणाऱ्या सबीना शौकत माझगांवकर यांच्या घराच्या बाथरुमच्या खिडकीची काच तोडून अनोळखी चोरट्याने घरातील लाकडी कपाटात ठेवलेले ८ लाख २१ हजारांची दागिने चोरून नेले होते. याप्रकरणी २ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दिवस ढवळ्या झालेल्या ह्या घरफोडीने परिसरात खळबळ उडाली होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी