शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

‘बुली बाई’चा पर्दाफाश; तरुणीसह तिघांना अटक; तिघे इंजिनीअरिंगचे विद्यार्थी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2022 08:33 IST

३१ डिसेंबरला आरोपींनी हे ॲप ‘गिट हब’वर अपलोड केले. याच दिवशी श्वेता सिंगने बुली बाई ॲपचे ट्विटर हॅण्डल बनविले. या ॲपवरून शीख आणि मुस्लीम समुदायाला एकाच वेळी टार्गेट करण्यात आल्याचे दिसून येते.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बुली बाई ॲप प्रकरणात उत्तराखंडमधून ताब्यात घेतलेल्या श्वेता अनंत सिंह (वय १८) या तरुणीसह बुधवारी मयंक प्रदीपसिंह रावत (२१) याला अटक करण्यात आली आहे. या दोघांसह यापूर्वी अटक केलेला विशाल कुमार झा हे तिघेही इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत. श्वेताने बुली बाई ॲपचे ट्विटर हॅण्डल तयार केले होते, तर ॲप बनविणाऱ्याचा शोध सुरू आहे. यामागचा उद्देश स्पष्ट झाला नसून, शिख धर्मीयांनी ॲप तयार केल्याचा बनाव निर्माण केल्याचे प्राथमिक तपासातून दिसून येते, अशी माहिती पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली.

सहा महिन्यांपूर्वी ‘सुल्लीडील्स’ या ॲपद्वारे मुस्लीम महिलांचे फोटो प्रदर्शित करून आभासी लिलावाद्वारे विक्री करण्याकरता गिटहब या प्लॅटफॉर्मचा वापर करण्यात आला होता. तसेच बुली बाई ॲपचा वापर करून मुस्लीम महिलांची बदनामी करण्याच्या हेतूने मुस्लीम महिलांचे फोटो ट्विटरवर प्रदर्शित करण्यात आले. याप्रकरणी दोन जानेवारीला गुन्हा नोंदवत, सायबर पोलिसांनी बंगळुरूच्या विशाल कुमार झा (२२) या तरुणाला अटक केली. तो बंगळुरूच्या दयानंद सागर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून सिव्हिल इंजिनिअरिंगच्या द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत आहे. विशालला तांत्रिक ज्ञान असून, त्याने ओळख लपवून यात ट्विट केले आहेत. तसेच त्याचे यूट्यूब चॅनेलदेखील आहे. तो @khalsasupermecist या ट्विटर हॅण्डलवर स्वतः कॅनडामध्ये असल्याचे भासवून अनेकदा ट्विट करत होता. त्याच्याकडून एक मोबाईल, लॅपटॉप, दोन सीमकार्ड हस्तगत करण्यात आली आहेत. त्यापाठोपाठ उत्तराखंडमधून श्वेतासह मयांकला चौकशीअंती अटक करण्यात आली आहे. 

श्वेता इंजिनिअरिंगची विद्यार्थिनी आहे. प्राथमिक तपासात श्वेताने सांगितले की, तिला नेपाळमधील व्यक्ती आदेश देत होता. तो तिचा सोशल मीडियावरील मित्र आहे. Jattkhalsa०७ या ट्विटर हॅण्डलचा वापर श्वेता करत होती. मात्र, नेपाळ कनेक्शनबाबत अद्याप मुंबई पोलिसांकडून दुजोरा देण्यात आलेला नाही. श्वेताला पाच दिवसांचे ट्रांझिट रिमांड मिळाले आहे.

३१ डिसेंबरला आरोपींनी हे ॲप ‘गिट हब’वर अपलोड केले. याच दिवशी श्वेता सिंगने बुली बाई ॲपचे ट्विटर हॅण्डल बनविले. या ॲपवरून शीख आणि मुस्लीम समुदायाला एकाच वेळी टार्गेट करण्यात आल्याचे दिसून येते. तसेच, बुली बाई ॲपला फॉलो करणाऱ्या ट्विटर हॅण्डलची नावे ही शीख समुदायाशी संबंधित ठेवण्यात आली आहेत.  तिने हे नेमके का आणि कुणाच्या सांगण्यावरून केले याबाबत सायबर पोलीस तपास करत आहेत.

शेकडो महिला टार्गेटश्वेताने सिंगने ट्विटरवर समाजातील प्रतिष्ठित मुली आणि महिलांचे फोटो वापरून बुली बाई नावाचे ॲप्लिकेशन विकसित केले. या ॲपवर भेट देणाऱ्यांकडून त्या महिलांवर बोली लावली जात होती. या ॲपद्वारे १०० मुस्लीम महिलांना लक्ष्य करण्यात आले. यामध्ये अभिनेत्री आणि काही पत्रकारांचीही नावे आहेत. पोलिसांनी आतापर्यंत ५ ट्विटर हॅण्डलचा शोध घेतला आहे.

मुस्लीम महिलांपाठोपाठ हिंदू महिलाही टार्गेटबुली-बाई ॲप प्रकरणात मुस्लीम महिलांना टार्गेट केल्याचे प्रकरण ताजे असतानाच, सोशल मीडियावर आता हिंदू समुदायातील महिलांविरुद्ध आक्षेपार्ह मजकूर असणारे ग्रुप टेलिग्रामवर बनवले जात असल्याचे समोर येत आहे. याची गंभीर दखल घेत, केंद्रीय मंत्रालयाने हे चॅनेल ब्लॉक करण्याची कारवाई केली आहे. दुसरीकडे असे कृत्य करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिला आहे.