शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांसमोर शिवसेनेच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या; पंजाबमध्ये सुधीर सुरी यांची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2022 08:58 IST

पोलिसांनी सांगितले की, सुधीर सुरी यांच्यावर हल्लेखोरांनी पाच गोळ्या झाडल्या.

अमृतसर : पंजाबमधील अमृतसर येथे शिवसेना नेते सुधीर सुरी यांची अज्ञात व्यक्तींनी शुक्रवारी गोळ्या झाडून हत्या केली. अमृतसर येथील मजिठा रोड या गजबजलेल्या भागातील गोपाल मंदिरनजीक सुधीर सुरी व त्यांचे कार्यकर्ते एका प्रकरणी निदर्शने करत असताना ही घटना घडली. या प्रकरणी हल्लेखोराला पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून हत्येसाठी वापरलेले पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. 

पोलिसांनी सांगितले की, सुधीर सुरी यांच्यावर हल्लेखोरांनी पाच गोळ्या झाडल्या. त्यात गंभीर जखमी झालेले सुरी हे जागीच कोसळले. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, पण उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. गँगस्टरच्या हिटलिस्टवर असलेल्या सुधीर सुरींच्या सुरक्षेसाठी पंजाब सरकारने आठ पोलीस कर्मचारी तैनात केले होते. या हत्येच्या घटनेबद्दल पंजाब भाजपचे अध्यक्ष अश्वनी शर्मा यांनी म्हटले आहे की, पंजाबमध्ये कायदा-सुव्यवस्थेच्या ठिकऱ्या उडाल्या आहेत, हे सुरी यांच्या हत्येमुळे  सिद्ध झाले आहे.

टॅग्स :PunjabपंजाबPoliceपोलिसDeathमृत्यूShiv Senaशिवसेना