शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मॅगझिन लावताना झाला फायर; नागपूरमध्ये पोलीस कर्मचारी गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2021 17:31 IST

Nagpur news: बेलतरोडी पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस शिपायी व्यंकट गंथाळे (चार्ली) याची शुक्रवारी नाईट ड्युटी होती. ती संपल्यानंतर त्याने त्याच्या जवळची सर्व्हीस रिव्हॉल्वर पोलीस ठाण्यात जमा करण्यापूर्वी साफ केली. मॅक्झिन बाहेर काढली. ती साफ केल्यानंतर वारंवार प्रयत्न करूनही मॅक्झिन लागत नव्हती.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर - सर्व्हीस रिव्हॉल्वरची लॉक झालेली मॅक्झिन फिट करताना ट्रिगर दबला. रिव्हॉल्वरची गोळी नायक पोलीस शिपायाच्या मांडीतून आरपार बाहेर निघाल्याने तो गंभीर जखमी झाला. बेलतरोडी पोलीस ठाण्याजवळ शनिवारी सकाळी १० च्या सुमारास ही थरारक घटना घडली. शेषकुमार देवीदास इंगळे (३५) असे जखमी पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

बेलतरोडी पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस शिपायी व्यंकट गंथाळे (चार्ली) याची शुक्रवारी नाईट ड्युटी होती. ती संपल्यानंतर त्याने त्याच्या जवळची सर्व्हीस रिव्हॉल्वर पोलीस ठाण्यात जमा करण्यापूर्वी साफ केली. मॅक्झिन बाहेर काढली. ती साफ केल्यानंतर वारंवार प्रयत्न करूनही मॅक्झिन लागत नव्हती. नाईट ड्युटीवरच असलेले नायक शिपायी इंगळे यांना गंथाळेने फोन केला. इंगळे तेव्हा बाजुच्या चहाच्या टपरीवरच होते. त्यांनी गंथाळेला तेथे बोलवून घेतले. रिव्हॉल्वर हातात घेऊन तिचे लॉक उघडले अन् मॅक्झिन फिट करत असताना अचानक रिव्हॉल्वरमधून गोळी सुटली. ती इंगळेच्या मांडीतून आरपार बाहेर पडली. इंगळे रक्ताच्या थारोळ्यात खाली पडले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. बाजुलाच पोलीस ठाणे असल्याने ठाण्यातील मंडळी धावली. त्यांनी इंगळेंना तातडीने खासगी ईस्पितळात दाखल केले. या घटनेची माहिती कळताच अतिरिक्त आयुक्त डॉ. दिलीप झळके, उपायुक्त डॉ. अक्षय शिंदे पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी ठाणेदार विजय आकोत यांच्याकडून घटनेची माहिती घेतली. त्यानंतर गंथाळेचा जबाब नोंदवून घेण्यात आला. माहिती कळताच पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनीही रुग्णालयात जाऊन इंगळेची भेट घेतली. वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्यांची प्रकृतीची माहितीही जाणून घेतली.----

बेफिकिरी नडलीइंगळे अडीच वर्षांपासून बेलतरोडी ठाण्यात कार्यरत आहेत. तत्पुर्वी ते अनेक वर्षे गडचिरोली पोलीस दलात कार्यरत होते. त्यामुळे शस्त्र हाताळणीचे त्यांना बऱ्यापैकी ज्ञान आहे. असे असूनही मॅग्झिन लावताना काहीशी बेफिकिरी झाली. त्यामुळे ही घटना घडली. सुदैवाने मांडीत गोळी शिरल्याने इंगळे बचावले. गोळी वरच्या भागात लागली असती तर मोठा अनर्थ घडला असता.

टॅग्स :nagpurनागपूरPoliceपोलिस